Weather Update Dainik Gomantak
देश

पुन्हा बदलणार हवामानाचा मूड, देशात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा येथे हलका मात्र मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

दैनिक गोमन्तक

देशातील अनेक भागांमध्ये आजकाल कडक ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोक त्रस्त आहेत. दरम्यान, आज देशाच्या अनेक भागात दिलासा मिळाल्याचे वृत्त आहे. दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक भागांमध्ये कडक उन्हामुळे (Summer) जनजीवन विस्कळीत झाले आहे. उन्हापासून वाचण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. लोक दुपारी घराबाहेर पडणे टाळत आहेत. आज गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि बिहार, झारखंड, ओडिशा, गंगा पश्चिम बंगाल, राजस्थान आणि दक्षिण हरियाणामध्ये उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) अंदाज आहे. (Weather Updates Today)

दिल्ली-एनसीआरसह अनेक भागात आजही तीव्र उष्णतेसह उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दिल्लीत आजही कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा प्रादुर्भाव झाल्याने पारा 44 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे.

मात्र हवामान विभागाचे (IMD) म्हणणे आहे की आज पंजाब, हरियाणा आणि पश्चिम राजस्थानच्या लगतच्या मैदानी भागात तुरळक आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, विदर्भ, छत्तीसगड आणि किनारी कर्नाटकात पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने (MID) दिलेल्या माहितीनुसार, आजपासून दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबतच मंगळवार ते 28 एप्रिलपर्यंत राजस्थान, दक्षिण हरियाणा आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, उत्तर किनारी आंध्र प्रदेश, पश्चिम हिमालय, सिक्कीम, हिमालयीन पश्चिम बंगाल आणि पूर्व बिहारच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. झारखंड, दक्षिण गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा येथे हलका आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Dabolim: लोकांच्या जीवाशी खेळ! उड्डाण पुलाच्या कामामुळे चालकांना धोका, वास्कोत नियमांची ऐशीतैशी; सळ्यांची धोकादायक वाहतूक

Vijay Merchant Trophy 2025: गोव्याची एक डाव, 152 धावांनी हार! दुसऱ्याच दिवशी पराभव; सलग तिसऱ्यांदा हाराकिरी

Goa Live News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Goa ZP Election: पंचायत मंत्री माविन गुदिन्होंनी बजावला मतदानाचा हक्क! म्हणाले, 'हा लोकशाहीचा उत्सव'

SCROLL FOR NEXT