भात पीक आडवे: नुकसानीमुळे गोव्यातील शेतकरी वर्ग हवालदिल

नऊ ठिकाणी झाडे पडली: दोन दिवस वादळी पावसाची शक्यता
Trees fell in nine places
Trees fell in nine placesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात गेल्या आठवडाभर वादळी पावसाने थैमान घातला असून जोराच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा फटका राज्यातील अनेक भागांना बसला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या पावसामुळे सात ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून यामुळे घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांनाही तडाखा बसला असून प्रामुख्याने भात आणि मिरची पिकावर याचा परिणाम झाला. पावसामुळे लाखोंचे नुकसान झाले असा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश कृषी संचालकांनी दिलेत.

Trees fell in nine places
जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात धेंपो क्लब पराभवाच्या छायेत

राज्यात साळावली, अंजूना आणि तिळारी धरणाखाली असलेल्या आणि वर्षभर पाणीपुरवठा असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भातशेती लागवड होते. सध्या भात पीक काढणीच्या दिवस आहेत. मागील हंगामामधला पाऊस लांबल्यामुळे या वर्षाची भात काढणी मे च्या मध्यापर्यंत चालणार आहे. सध्या 9 हजार हेक्टरवर भात पीक उभे आहे. पावसामुळे या भात पिकावर मोठा परिणाम होत असून भात पीक आडवे पडत आहे. यामुळे या पिकांचे काढणी करताना त्रास वाढत आहे.

का पडतोय पाऊस?

अरबी समुद्रातील आर्द्रता आणि खंडीय प्रदेशात निर्माण होणाऱ्या कडक उष्णतेचे ट्रफ्स यामुळे अनेक ठिकाणी वादळी स्थिती निर्माण होत आहे. यामुळे ढगांचे घर्षण वाढते आणि विजा चमकून अचानक जोरदार वारे वाहण्याबरोबर पावसाला सुरुवात होते. अशी स्थिती सध्या असल्याने पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

पावसासोबत तापमानही वाढले

राज्यातील तापमान 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढले आहे. सोमवारी पणजीत कमाल ३४ व मडगाव येथे 33.5 अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. मात्र, मंगळवारी दोन्हीकडील तापमान वाढले. मंगळवारी पणजीत कमाल 35.1 तर मडगाव येथे कमाल 34.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकच्या काही भागांवर आद्रता खाली आल्याने विशेष टर्फ तयार झाला आहे. त्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण लाटेमुळे दोन दिवसात तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.-एम.राहुल, हवामान अधिकारी, गोवा वेधशाळ

Trees fell in nine places
वास्को मांगुरहिल परिसरात मंदिरात जाणारा रस्ता भारतीय नौसैनिकांनी केला बंद

पावसामुळे पिकांचे नुकसान वाढणार आहे. आम्ही पंचनामा करून आढावा घेण्याच्या सूचना कार्यालयांना दिल्यात. शेतकऱ्यांनीही कृषी खात्याकडे संपर्क साधावा. शेतकरी आधार निधी योजनेनुसार हेक्टरी 40 हजार रुपयांची मदत केली जाऊ शकते. - नेविल अल्फान्सो, संचालक, कृषी खाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com