weather Updates Dainik Gomantak
देश

उष्णतेमुळे लोकांचे हाल! कडक उन्हात मुसळधार पावसाची शक्यता

सकाळपासूनच सूर्यप्रकाशाची किरणे आभाळातून आगीचा वर्षाव झाल्यासारखी राहतात.

दैनिक गोमन्तक

Weather Updates: देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेमुळे लोकांचे हाल झाले आहेत.आता येणारा महिना तर लोकांच्या अंगातून घाम काढणारा आहे. कडक उन्हामुळे लोकांना उष्णतेचा त्रास होत आहे. सकाळपासूनच सूर्यप्रकाशाची किरणे आभाळातून आगीचा वर्षाव झाल्यासारखी राहतात. उन्हामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना रस्त्यावरून बाहेर पडणे कठीण झाले आहे. कडक उन्हामुळे लोक घामाने भिजत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हवामानात बदल होऊ शकतो. तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. (Weather Updates)

कडाक्याच्या उन्हात 30 एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरसह अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. एमआयडीनुसार येत्या काही दिवसांत तापमानातही वाढ होणार आहे. 29 एप्रिल रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत गुजरात आणि महाराष्ट्राच्या तुलनेत कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 30 एप्रिलपर्यंत राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भागात तीव्र उष्णता जाणवेल.

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज ते 30 एप्रिलपर्यंत जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये गडगडाट किंवा विजांचा कडकडाट होऊ शकतो. यासोबतच अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड आणि मणिपूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. या काळात या भागात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.कडाक्याच्या उन्हात हवामानात अचानक झालेल्या बदलाचे प्रमुख कारण हिमालयातून बाहेर पडणारे वेस्टर्न डिस्टर्बन्स असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT