Weather Update: cold wave in India in next four days

 

Dainik Gomantak

देश

Weather Update: देशात गारवा वाढला, हवामान खात्याचा बर्फवृष्टीचा अंदाज

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या चार ते पाच दिवसांत देशातील अनेक भागात थंडीचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

निम्मा डिसेंबर महिना संपत आला आहे यासोबतच देशाच्या अनेक भागात थंडीनेही जोर पकडला आहे. हवामान खात्याने (Metrological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या चार ते पाच दिवसांत देशातील अनेक भागात थंडीचा (Cold) जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारत, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशातही हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. शुक्रवारीही उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी अपेक्षित आहे.(Weather Update: cold wave in India in next four days)

एकीकडे देशाची राजधानी दिल्लीत तापमान 8.7अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले असतानाच . यासोबतच येथे ढगांसह पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर येथे थंडी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, त्रिपुरामध्ये देखील असाच अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, देशातील अनेक भागात तापमानात घट होऊ शकते. 17 ते 21 डिसेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर 18 ते 21 डिसेंबरपर्यंत उत्तर राजस्थान आणि 19 ते 21 डिसेंबरपर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशातही हीच परिस्थिती राहील.

तर दुसरीकडे पुढील 4 ते 5 दिवसांत, वायव्य आणि मध्य भारत वगळता गुजरातच्या बहुतेक भागांमध्ये किमान तापमान 2-4 अंश सेंटीग्रेडने घसरण्याची शक्यता आहे. पूर्व भारत आणि महाराष्ट्रात ही घसरण 2 ते 3 अंश सेंटीग्रेड असेल. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील दोन दिवस दाट किंवा खूप दाट धुके राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वायव्य राजस्थान, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 17 डिसेंबर रोजी खूप दाट धुके निर्माण होतील असा देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT