Arvind Kejriwa Viral Video Dainik Gomantak
देश

Watch Video: "पापा केजरीवाल तो केहता हैं बील नही आएगा..."; बाप लेकाच्या व्हायरल व्हिडिओचा सोशल मीडीयावर धुमाकूळ

Arvind Kejriwa: व्हायरल व्हिडीओमध्ये, चिमुकला लाइट बिलाची चिंता न करता वडिलांना एसी चालू करण्यास सांगत असल्याचे ऐकू येत आहे.

Ashutosh Masgaunde

Kid Expressing His Belief in AAP Leader Arvind Kejriwals Promise for 'Free Electricity' to Haryana:

'आप'चे (AAP) नेते अरविंद केजरीवाल यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी (Loksabha Election 2024) मतदान केल्यास हरियाणाला 'मोफत वीज' देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास व्यक्त करणाऱ्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गगनदीप सिंह नावाच्या आप'च्या एका नेत्याने हे ट्विट केले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, लहान मुलागा विजेच्या बिलाची चिंता न करता वडिलांना एअर कंडिशनर चालू करण्यास सांगताना ऐकू येत आहे.

हा चिमुकला म्हणतो, "पापा एसी चला दो बहुत गर्मी हो रही हैं, यावर चिमुकल्याचे वडिल म्हणतात, "बील बहुत आएगा".

वडिलांना उत्तर देत चिमुकल्या पुन्हा म्हणतो, "पापा केजरीवाल तो केहता हैं बील नही आएगा..."

नेटिझन्स म्हणतात...

सिंग यांनी गुरुवारी हा व्हिडिओ ट्विट केला होता, ज्यात असे लिहिले होते, "हरियाणातील प्रत्येक मुलालाही हे माहीत आहे की, ज्या राज्यात केजरीवाल आहेत, तेथे वीज बिल येणार नाही.

मुलगा त्याच्या वडिलांसोबत ज्या पद्धतीने संभाषण करतोय ते पाहूण नेटिझन्स या गोंडस मुलाच्या आवाजाच्या प्रेमात पडले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला उत्तर देताना लोकांनी "खूप गोंडस" अशी एका शब्दात प्रतिक्रिया दिली.

केजरीवाल यांचे आश्वासन

गेल्या महिन्यात, आम आदमी पक्षाने हरियाणातील (Haryana) पंचकुला येथे 'बिजली आंदोलन' केले होते. आणि 2024 मध्ये आगामी निवडणुकीत पक्षाला पाठिंबा दिल्यास मोफत वीज देण्याचे आश्वासन मतदारांना दिले.

भाजपचा हल्लाबोल

गेल्या दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे दिल्लीतील अनेक भागांतील रस्ते व इतर सुविधांचे नुकसान झाले आहे.

या भागात भेट दिल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर मोफत विजेच आश्वासन पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्याचा आरोप केला.

पीटीआय या वृत्तसंस्थेने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, "अशा मुख्यमंत्र्यांची लाज वाटते, जो स्वतःला ४० कोटी रुपयांचा 'शीशमहाल' बांधतो, पण लोकांना पिण्याचे पाणी आणि मोफत वीज पुरवण्यात अपयशी ठरतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT