Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

Viral Video: फरीदकोटमध्ये अमली पदार्थांची होतेय खुलेआम विक्री

आम आदमी पक्षाने पंजाबची सत्ता काबीज केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच कुख्यात ड्रग माफियांचा राज्याच पुन्हा सुळसुळाट वाढला आहे.

दैनिक गोमन्तक

आम आदमी पक्षाने पंजाबची सत्ता काबीज केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच कुख्यात ड्रग माफियांचा राज्याच पुन्हा सुळसुळाट वाढला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंजाबमधील तरुण 'चिट्टा' विकत घेण्यासाठी रांगेत उभे आहेत.

तसेच, पंजाबमधील पत्रकार गगनदीप सिंग यांच्या म्हणण्यानुसार, पंजाबमधील लोक स्थानिक अमली पदार्थ विक्रेत्यांकडून भाज्या किंवा राशनप्रमाणेच अमली पदार्थाची खरेदी करत होते. व्हिडिओमध्ये, पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील रेल्वे ट्रॅकवर हताश अंमली पदार्थांचे व्यसनी रोख रक्कम देऊन ड्रग्ज खरेदी करताना दिसत आहेत.

दुसरीकडे, पत्रकार गगनदीप सिंग यांनी पुष्टी केली की, हा व्हिडिओ फरीदकोटचा आहे. एसएसपी अवनीत कौर यांनीही या व्हिडिओची पुष्टी केली आहे. याप्रकरणी काही माफियांना अटकही करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील आप सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील ड्रग माफियांना आळा घालण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांनी बुधवारी पंजाब सरकारवर जोरदार निशाणा साधला.

नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी ट्विटरवरुन आपच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'राज्यातील ड्रग्ज विक्रेत्यांना संपवण्याबाबत विद्यमान मुख्यमंत्र्यांची अनास्था दिसून येत आहे.' फरीदकोट जिल्ह्यातील एका गावात ड्रग्ज विकतानाचा व्हिडिओही देखील सिध्दूंनी यावेळी शेअर केला आहे.

दुसरकीडे, मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आणि आम आदमी पार्टीचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांना टॅग करत नवज्योतसिंग सिद्दू यांनी लिहिले, “STF अहवाल आणि माननीय उच्च न्यायालयाने अनेक प्रसंगी असे निरीक्षण नोंदवले आहे की, ड्रग्ज पेडलर, पोलिस आणि राजकारणी यांच्यातील संबंध अधिक गडद आहेत. जे अद्याप अस्तित्वात आहे. राजकीय अनुपस्थिती... परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. कुठेतरी फरीदकोटमध्ये”.

तसेच, पंजाब (Punjab) पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी महाविद्यालयीन तरुणी आणि दोन पुरुष साथीदारांना अटक केल्याच्या एका आठवड्यानंतर ही घटना घडली आहे.

याशिवाय, काउंटर इंटेलिजन्स विभागाने खालसा कॉलेजची एमएससी बायोटेकची विद्यार्थिनी - लवप्रीत कौर आणि तिच्या दोन साथीदारांना अमृतसरमधून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी अटक केली होती. कौर, चुलत भाऊ दीपक राय आणि मेहक राय, दोघेही सीमावर्ती गावातील महवा येथील रहिवासी आहेत. सीआयने एका फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात 6 किलो हेरॉईनसह त्यांना अटक केली. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 42 कोटी रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 16 September 2025: र्थिक ताण जाणवू शकतो, रोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी; मित्रांकडून मदत

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

SCROLL FOR NEXT