Three Lashkar-e-Taiba terrorists killed by security forces -Kashmir  Dainik Gomantak
देश

Watch Video: कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांकडून लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Lashkar-e-Taiba: दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी वाढवली आहे. लष्कर-ए-तैयबाच्या आणखी तीन दहशतवाद्यांना जवानांनी घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ashutosh Masgaunde

Watch Video, Three Lashkar-e-Taiba terrorists killed by security forces in Kulgam encounter:

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

गुरुवारी सकाळी सुरू झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी ठार केले आहे. शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांना कुलगामच्या सामनू भागात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम राबवली.

दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यानंतर त्याचे रुपांतर चकमकीत झाले. या भागात सुरक्षा दलांचे अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

या संयुक्त कारवाईत लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्स, एलिट स्पेशल फोर्स युनिट, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान सहभागी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी वाढवली आहे. लष्कर-ए-तैयबाच्या आणखी तीन दहशतवाद्यांना जवानांनी घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये दोन स्थानिक आणि एका विदेशी दहशतवाद्याचा समावेश आहे.

मात्र, अधिकाऱ्यांकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वी गुरुवारी रात्री कुलगाममध्ये शांतता होती. मात्र शुक्रवारी सकाळी गोळीबार सुरू झाला. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून लोकांना दूर राहण्यास सांगितले आहे.

काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील डीएच पोरा भागातील सामनू पॉकेटमध्ये गुरुवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर नेहामा गावात शोध मोहीम सुरू करण्यात आली. लष्कराचे जवान येताना पाहून दहशतवाद्यांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.

लष्कराने तात्काळ जबाबदारी स्वीकारली आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी चकमक क्षेत्राच्या सभोवताली कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे, जिथे अजून दहशतवादी अडकले आहेत. गुरुवारी रात्री शोधमोहीम थांबवण्यात आली होती मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा ती सुरू करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT