Srinagar Dainik Gomantak
देश

Independence Day 2023: श्रीनगरच्या लाल चौकात नागिन डान्स, स्वातंत्र्याच्या जल्लोषात लोक तल्लीन, Video

Independence Day 2023: श्रीनगरमधील लाल चौकातून असा एक व्हिडिओ समोर आला असून, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Independence Day 2023: आज 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यापासून ते जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपर्यंत स्वातंत्र्याचा उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.

दरम्यान, श्रीनगरमधील लाल चौकातून असा एक व्हिडिओ समोर आला असून, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न झालेले लोक नागिन नृत्य करताना दिसत आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

दरम्यान, कलम-370 हटवल्यानंतर लाल चौकात तिरंगा फडकवणे सोपे झाले आहे. 2019 पूर्वी ते कठीण होते. केंद्रशासित प्रदेशातून कलम-370 हटवण्यात आल्यापासून राज्यात समृद्धी आली आहे. दहशतवादी (Terrorist) घटनांमध्ये घट झाली आहे. परिस्थिती पूर्वीपेक्षा आता खूप चांगली झाली आहे. आता लोक येथे परेड आणि कार्यक्रमांमध्ये निर्भयपणे सहभागी होतात.

तिरंगा फडकवला...

श्रीनगरच्या (Srinagar) लाल चौकापासून अनंतनाग, पुलवामा, किश्तवाड, डोडापर्यंत लोकांनी तिरंगा फडकावला. खरे तर, ज्या खोऱ्यात स्वातंत्र्यदिनी शांतता होती, तिथे लोकांच्या हातात तिरंगा होता. श्रीनगरच्या लाल चौकातील चित्र बदलले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीनगरमधील लाल चौकातील घंटाघर तिरंग्यात उजळून निघाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT