Virender Sehwag Brother Arrested Dainik Gomantak
देश

Virender Sehwag Brother Arrested: घटस्फोटाची चर्चा असतानाच छोट्या भावाला अटक; वीरेंद्र सेहवागच्या अडचणी आणखी वाढल्या

Virender Sehwag Brother: वीरेंद्र सेहवागचा लहान भाऊ विनोद सेहगावला चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे.

Sameer Amunekar

क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग अडचणीत आला आहे. वीरेंद्र सेहवागचा लहान भाऊ विनोद सेहगावला चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टानं विनोद सेहवागला फरार घोषित केलं होतं. त्यानंतर त्याला चंदीगडच्या मनीमाजरा पोलिसांनी अटक केली. विनोद सेहवागला चेक बाऊन्सच्या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.

चेक बाऊन्स प्रकरणात विनोद सेहवाग कोर्टात हजर झाला नाही, म्हणून त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं. विनोद विरोधात ७ कोटीचा चेक बाऊन्स झाल्याच प्रकरण कोर्टात सुरु आहे.

त्याला याच प्रकरणात कोर्टात हजर राहण्यासाठी सांगितलं होतं. पण विनोद सेहवाग कोर्टात हजर झाला नाही, म्हणून त्याला फरार घोषित करण्यात आलं.

विनोद सेहवागला ७ कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात २ वर्षांपूर्वी एफआयआर नोंदवण्यात आला होता. सेक्टर १२ पंचकुला येथील रहिवासी आणि खाटा बद्दी येथील श्री नैना प्लास्टिक इंक.चे मालक कृष्ण मोहन खन्ना यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला होता.

तक्रारदाराचे वकील विकास सागर यांनी सांगितलं की, विनोद सेहवागच्या जालता कंपनीने त्यांच्या कंपनीकडून ७ कोटी रुपयांचा माल घेतला होता. २०१८ मध्ये त्याचे पेमेंट १ कोटी रुपयांचे ७ चेक देऊन करण्यात आले होते, परंतु हे चेक बाउन्स झाले.

२ महिन्यांनंतरही जेव्हा चेक क्लियर झाले नाहीत, तेव्हा कंपनीला १५ दिवसांच्या आत पेमेंट क्लियर करण्यास सांगणारी कायदेशीर नोटीस देण्यात आली. परंतु जेव्हा कंपनीने पेमेंट केले नाही, तेव्हा त्यांनी चेक बाउन्स झाल्याचा गुन्हा दाखल केला.

छोट्या भावाच्या अटकेमुळे वीरेंद्र सेहवागच्या अडचणीत वाढल्या आहेत. आधीच विरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता; पणजीत टळली मोठी दुर्घटना

Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

ICC Fine Team India: रोहित, विराटसह सर्वच खेळाडूंना धक्का! 'आयसीसी'ने ठोठावला दंड; एकदिवसीय मालिकेतील 'ती' चूक पडली भारी

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

SCROLL FOR NEXT