Virat Kohli sells One8 Dainik Gomantak
देश

कोहली विकणार 'One8'! PUMA नाही, बंगळूरमधल्या कंपनीसोबत केला कोट्यवधींचा करार

Virat Kohli One8 Deal: त्याने आपला यशस्वी 'वन8' स्पोर्टिंग ब्रँड बंगळूर-स्थित स्टार्टअप ‘ॲगिलिटास स्पोर्ट्स’ला विकण्याचा निर्णय घेतलाय.

Akshata Chhatre

Agilitas One8 Acquisition: भारतीय क्रिकेटचा तारा आणि व्यावसायिक जगतातील एक महत्त्वाचे नाव, विराट कोहली याने एक मोठा व्यावसायिक निर्णय घेतला आहे. त्याने आपला यशस्वी 'वन8' (One8) स्पोर्टिंग ब्रँड बंगळूर-स्थित स्टार्टअप ‘ॲगिलिटास स्पोर्ट्स’ला विकण्याचा निर्णय घेतलाय. हा केवळ ब्रँड विक्रीचा करार नसून, कोहलीने याच कंपनीत ४० कोटी रुपयांची वैयक्तिक गुंतवणूक करून अल्प-भागधारक (Minority Shareholder) म्हणून नवी व्यावसायिक इनिंग सुरू केली आहे.

'वन8' ची विक्री आणि ४० कोटींचा नवा डाव

या करारानुसार, विराट कोहलीने त्याचा 'वन8' ब्रँड ॲगिलिटास स्पोर्ट्स कंपनीला विकला आहे. 'ॲगिलिटास' मध्ये त्याने स्वतःच्या क्षमतेतून ४० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केलीये. ॲगिलिटासचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, या करारामुळे विराट कोहली कंपनीमध्ये अल्प-भागधारक बनलाय. त्यांनी कोहलीचा हिस्सा 'मध्यम सिंगल डिजिट' श्रेणीत (Mid Single Digits) असेल असे स्पष्ट केले.

विशेष भागीदारीची अट

कोहली आता अन्य कोणत्याही स्पोर्ट्स ब्रँडचे एंडोर्समेंट करू शकणार नाही. ॲगिलिटासचे सीईओ अभिषेक गांगुली यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केले की, कोहली हा केवळ गुंतवणूकदार नाही, तर तो कंपनीच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी उत्सुक आहे. ‘तो सोडलेल्या ३०० कोटी रुपयांच्या कराराची भरपाई करण्याचा विचार करत नाहीये, तर ॲगिलिटासमध्ये भागधारक बनून भविष्यात मोठे फायदे मिळवण्याचा त्याचा हेतू आहे,’ असे गांगुली यांनी सांगितले.

जुना संबंध तुटला, नवा अध्याय सुरू

हा करार होण्यापूर्वी 'वन8' ब्रँड पुमा या जर्मन कंपनीचा भाग होता, कारण पुमासोबत त्याचा परवाना करार होता. हा करार संपल्यानंतर काही महिन्यांतच कोहलीने ॲगिलिटाससोबत हातमिळवणी केली.

विशेष म्हणजे, ॲगिलिटासचे सीईओ अभिषेक गांगुली यांनीच पूर्वी पुमा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक असताना सुमारे २०१७ मध्ये कोहलीला पुमाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून करारबद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तो करार सुमारे ११० कोटी रुपयांचा होता. या वर्षाच्या सुरुवातीला, पुमाने कोहलीला सुमारे ३०० कोटी रुपयांची नूतनीकरणाची ऑफर दिली होती. पण कोहलीने ती नाकारून ॲगिलिटासची निवड केली.

ॲगिलिटासची वाढती ताकद

बंगळूर-आधारित ॲगिलिटाससाठी 'वन8' चे अधिग्रहण हे दुसरे मोठे पाऊल आहे. त्यांनी वर्षभरापूर्वीच मोचिको शूज या शू-उत्पादक कंपनीचे अधिग्रहण केले आहे, जी ॲडिडास, पुमा, न्यू बॅलन्स, स्केचर्स, रीबॉक, ॲसिक्स, क्रॉक्स आणि यूएस पोलो यांसारख्या अनेक जागतिक ब्रँडसाठी शूज बनवते. यातून ॲगिलिटासची उत्पादन क्षेत्रातील क्षमता स्पष्ट होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

SCROLL FOR NEXT