Virat Kohli Dainik Gomantak
देश

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Virat Kohli Viral Video: एका व्हिडिओमुळे भारतीय चाहत्यांची धडधड वाढली आहे, कारण या व्हिडिओमुळे वर्ल्ड कप 2023 फायनलच्या वाईट आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

Manish Jadhav

Virat Kohli Practice Session Video: भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबरपासून वनडे (ODI) मालिका सुरु होत आहे. या मालिकेमुळे 9 मार्चनंतर पहिल्यांदाच विराट टीम इंडियाच्या जर्सीत मैदानात दिसेल.

दरम्यान, या मालिकेसाठी विराट ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे. त्याच्या सरावाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, एका व्हिडिओमुळे भारतीय चाहत्यांची धडधड वाढली आहे, कारण या व्हिडिओमुळे वर्ल्ड कप 2023 फायनलच्या वाईट आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

पर्थमध्ये सराव जोरात

पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर 19 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या मालिकेसाठी संपूर्ण टीम इंडिया कसून सराव करत आहे. या मालिकेत सर्वात जास्त लक्ष विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीकडे लागले आहे, कारण या दोन्ही दिग्गजांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य अनिश्चित मानले जात आहे. त्यामुळे सराव सत्रातही हे दोन स्टार फलंदाजच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत.

16 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या सराव सत्रात विराट कोहली नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसला. त्याने उत्तम फटकेबाजी केली. मात्र काही वेळा तो फटका मारण्यात चुकला. याच वेळी त्याने मारलेल्या एका शॉटमुळे चाहत्यांचे जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या.

नेट्समध्ये घडला वर्ल्ड कप फायनलचा फ्लॅशबॅक

नेट्समध्ये फलंदाजी करत असताना विराटने बॅकफूटवर 'लेट कट' खेळण्याचा प्रयत्न केला. हा शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना चेंडू त्याच्या बॅटला लागून थेट स्टंप्सवर आदळला आणि विराट बोल्ड झाला. हे दृश्य पाहताच विराटने निराशेने वर पाहिले, जणू त्याला वर्ल्ड कप 2023 फायनलचा 'फ्लॅशबॅक' आठवला असावा.

18 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पॅट कमिन्सच्या चेंडूवर असाच शॉट खेळताना विराट कोहली त्याच पद्धतीने बोल्ड झाला होता, हे भारतीय चाहते कधीही विसरु शकत नाहीत. वर्ल्ड कप फायनलमध्ये विराटने गमावलेली ती विकेट टीम इंडियाला मोठा स्कोअर करण्याच्या आशेला मोठा धक्का देणारी ठरली होती. परिणामी टीम इंडियाने तो फायनल सामना गमावला होता आणि वर्ल्ड कप ट्रॉफी हातातून निसटली होती.

आता विराट कोहलीचे क्रिकेटमधील भविष्य एका मोठ्या टप्प्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अशा प्रकारे बोल्ड होताना पाहून चाहत्यांना भीती वाटत आहे की, पुन्हा त्याच पद्धतीने विकेट गमावल्याने त्याचा वनडे करियर संपणार नाही ना! त्यामुळे ही मालिका विराट आणि चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT