Virat Kohli New Look Dainik Gomantak
देश

Virat Kohli New Look: "दाढी पिकली, 50 वर्षाचा दिसतोस" किंग कोहलीचा नवा लूक व्हायरल, नेटिझन्सनी केलं ट्रोल

Virat Kohli Look: भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार आणि जगातील सर्वात मोठ्या क्रिकेटरांपैकी एक असलेला विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मैदानावरील खेळामुळे नाही, तर यावेळी त्याच्या नवीन लूकमुळे तो सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. पांढऱ्या दाढीमुळे अधिक वयस्कर दिसणारा कोहली पाहून चाहते थक्क झाले असून, एक्सवर त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सध्या क्रिकेटपासून दूर असलेला ३६ वर्षीय कोहली शेवटचा आयपीएल २०२५ दरम्यान खेळताना दिसला होता. त्यावेळी त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाने पहिली ट्रॉफी जिंकली होती. स्पर्धेदरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना धक्का दिला आणि जाहीर केले की तो पुढे फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे.

या दरम्यान, लंडनमध्ये असलेल्या कोहलीचा एका चाहत्यासोबतचा फोटो एक्सवर व्हायरल झाला. फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा हुडी जॅकेट आणि कॅप घातली आहे, मात्र सर्वाधिक चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे त्याची पांढरी झालेली दाढी. चाहत्यांना हा लूक पाहून धक्का बसला आणि त्यांनी विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

‘शिवम ओझा’ नावाच्या एका वापरकर्त्याने लिहिले, "विराट कोहली ५० वर्षांचा दिसतोय." तर ‘द लास्ट डान्स’ या अकाउंटवरून लिहिले गेले, "कोहली काका झाला आहे." आणखी एका युजरने मजेशीरपणे म्हटले, "पांढरी दाढी पाहून वाटतंय की तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची तयारी करत आहे.

अलिकडेच एका कार्यक्रमादरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर कोहलीला प्रश्न विचारला असता त्याने हलक्याफुलक्या अंदाजात उत्तर दिले होते, "जेव्हा तुम्हाला दर चार दिवसांनी दाढी रंगवावी लागते, तेव्हा समजून घ्या की वेळ आली आहे."

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा लूक पाहून कोहली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या पुनरागमनात चाहते नव्या खेळीइतकेच त्याच्या नव्या लूकचीही आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आत्मविश्वास उंचावेल,नात्यांमध्ये विश्वास वाढेल; 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

SCROLL FOR NEXT