Virat Kohli vs Cheteshwar Pujara Dainik Gomantak
देश

Test Record: विराट की पुजारा? 103 कसोटीनंतर कुणाचा रेकॉर्ड आहे खास; वाचून वाटेल आश्चर्य

Virat Kohli vs Cheteshwar Pujara Test Reocrd: भारतीय क्रिकेटसाठी अनेक वर्षे योगदान येणारे चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी 2025 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निरोप घेतला.

Sameer Panditrao

Virat Kohli vs Cheteshwar Pujara Test Reocrd: भारतीय क्रिकेटसाठी अनेक वर्षे योगदान येणारे चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी 2025 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निरोप घेतला. पुजाराने संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, विराट कोहली सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे.

चेतेश्वर पुजारा याने आपली टेस्ट कारकीर्द 103 सामन्यांत 7195 धावा करून संपवली. त्याचा सरासरी 43.60 होती. त्याने 19 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली. त्याचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर 206 आहे.

विराट कोहलीने (Virat Kohli) 123 टेस्ट सामन्यांत 9230 धावा केल्या. मात्र जर केवळ 103 सामन्यांपर्यंत तुलना केली, तर विराटने त्या टप्प्यावरच 8094 धावा, 27 शतके आणि अनेक आठवणीत राहणाऱ्या खेळी केल्या होत्या. त्याने एकूण टेस्ट कारकीर्दीत 30 शतके आणि 31 अर्धशतके केली. विराट कोहलीचा टेस्टमधील सरासरी 46.85 आहे.

विराट कोहलीने भारतासाठी 68 टेस्ट सामन्यांमध्ये नेतृत्व केलं असून त्यात भारताने 40 सामने जिंकले, जे आतापर्यंतच्या सर्वाधिक आहेत. त्यामुळे तो भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट कर्णधार आहे. पुजाराने केवळ 5 वनडे सामने खेळले होते, तर विराटने आपली वनडे कारकीर्द अजूनही सुरु ठेवली आहे. आतापर्यंत विराटने 302 वनडे सामन्यांतून 14181 धावा केल्या असून तो सर्वात जलद 10000 वनडे धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावे 51 वनडे शतके असून तो सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावावरती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT