Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: रस्त्याच्या मधोमध सांडांची WWE स्टाईल फाईट! स्कूटीवरुन जाणारी तरुणी सापडली कचाट्यात; थरारक व्हिडिओ व्हायरल

Raipur Ox Fight Video: सोशल मीडियावर अनेकदा सांड (Ox) एकमेकांशी भांडतानाचे व्हिडिओ (Video) व्हायरल होतात.

Manish Jadhav

Raipur Ox Fight Video: सोशल मीडियावर अनेकदा सांड (Ox) एकमेकांशी भांडतानाचे व्हिडिओ (Video) व्हायरल होतात. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सांड धुमाकूळ घालताना दिसतात. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) रायपूर शहरातील (Raipur) असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यात दोन सांड आपसांत लढत असताना एका स्कूटीवरील तरुणी त्यांच्या कचाट्यात सापडली.

आधी हा व्हिडिओ पाहा!

नेमके काय घडले?

व्हिडिओमध्ये दोन सांड आपापल्या शिंगांच्या बळावर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध त्यांचे हे भांडण सुरु आहे. या भांडणामुळे आजूबाजूला धुळीचे लोट उडत असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे. त्याचवेळी, एका तरुणीची स्कूटीवरुन एंट्री होते. सांडांची लढाई पाहून ती स्कूटी वळवण्याचा प्रयत्न करते. ती स्कूटी वळवत असतानाच, एका सांडाने दुसऱ्या सांडाला इतक्या जोरात धक्का दिला की तो दुसऱ्या बाजूला ढकलला गेला आणि थेट तिच्या स्कूटीवर जावून आदळला. या धक्क्याने ती तरुणी स्कूटीसह खाली पडली.

व्हिडिओमध्ये एक आणखी व्यक्ती दिसते, जी त्या तरुणीच्या पुढे स्कूटीवर होती. सांडांची लढाई पाहताच ते वेळेचे भान राखून स्कूटीवरुन पळून गेले. त्यांनी मागे वळूनही पाहिले नाही. मात्र, ती तरुणी खाली पडल्यानंतरही हिंमत हारली नाही. ती लगेच उठली आणि तडक स्कूटी उचलून तिथून निघून गेली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

इन्स्टाग्रामवर @iamankit. नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 74 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेक युजर्संनी प्रतिक्रियाही दिल्या. काहींनी या घटनेवर चिंता व्यक्त केली, तर काही लोक हसत आहेत. एका युजरने म्हटले की, "हा विनोदाचा भाग नाही, जर त्या तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली असती, तर मोठा अपघात झाला असता."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Campaign In Goa: गोव्यात 'एसआयआर' मोहिमेला सुरुवात; बूथ लेव्हल अधिकारी करणार डोर-टू-डोर सर्व्हे; डॉक्युमेंट तयार ठेवण्याचे मतदारांना आवाहन

गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

Pakistan Supreme Court Blast: पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा धमाका! 12 जण गंभीर जखमी; स्फोटाचे नेमके कारण काय?

Yashasvi Jaiswal Century: दक्षिण आफ्रिकेची 'डोकेदुखी' वाढली! कसोटी मालिकेपूर्वी यशस्वी जयस्वालचा 'मास्टरस्ट्रोक', ठोकलं शानदार शतक

Horoscope: मालामाल व्हा! कार्तिक पौर्णिमेला राशीनुसार दान करा 'या' वस्तू; देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

SCROLL FOR NEXT