Jewelry shop robbery viral video Dainik Gomantak
देश

Viral Video: महिलेची हातचलाखी, ज्वेलरी शॉपमधून चोरी केला सोन्याचा महागडा नेकलेस, पाहा व्हिडिओ

Women Theft Viral Video: चोरी झालेला सोन्याचा नेकलेस सहा लाख रुपये किंमतीचा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

उत्तर प्रदेश: ज्वेलरी शॉपमधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याच्या अनेक घटना अनेकवेळा समोर आल्या आहेत. बऱ्याचवेळा हातचलाखी करुन, कामगारांची नजरचुकवून चोरी केल्याचे प्रकार समोर येत असतात. अशीच एका चोरीची घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. यात महिला भलामोठा सोन्याचा नेकलेस चोरी करताना दिसत आहे.

महिला तिच्या पतीसोबत ज्वेलरीच्या दुकानात आली असून, ती विविध नेकलस पाहत आहे. दरम्यान, समोर असणाऱ्या चार नेकलेसमधून एक ती साडीमध्ये लपवते आणि इतर समोर ठेवते. विशेष म्हणजे यावेळी दुकानातील कर्मचारी / मालक समोरच उभा आहे. महिलेने हातचलाखीने नेकलेस साडीमध्ये लपवताना व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

नेकलेस चोरी केल्यानंतर महिला पतीसोबत दुकानातून बाहेर जाते. एक नेकलेस गायब झाल्याची समजताच दुकानदाराने याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशर मधील ही घटना असल्याचे सांगितले जाते. ज्वेलरी शॉपचा मालक गौरव पंडीत यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

चोरी झालेला सोन्याचा नेकलेस सहा लाख रुपये किंमतीचा  असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरीचा व्हिडिओ समोर आला असून, यात चोरी करणारी महिला आणि तिचा पती स्पष्ट दिसत असला तरी संशयितांना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशी फोंडा पोटनिवडणूक रद्द! एक वर्षाचा कार्यकाळ रिक्त पदापासून की निकालापासून?; सुप्रीम कोर्ट करणार 'फैसला'

खरी कुजबुज: युवा काँग्रेस ‘सायलेंट मोड’वर?

Goa Politics: आर्लेकर, आरोलकर मला घाबरलेत! माजी मंत्री बाबू आजगावकरांचा हल्लाबोल; आमदारकीचा वापर लुटीसाठी केल्‍याचाही आरोप

Mopa Airport Taxi Protest: मोपा टॅक्सी आंदोलन प्रकरणी आमदार सरदेसाईंसह 54 जणांवर गुन्हे दाखल; 15 जूनला चौकशीसाठी पाचारण

Goa Politics: 'प्रभाग आरक्षणाचे निकष स्पष्ट करा, अन्यथा कोर्टात खेचू' सरदेसाईंचा सरकारला इशारा; पालिका निवडणुकीत 'रडीचा डाव' खेळू देणार नाही

SCROLL FOR NEXT