Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: जादू की कला? मलिंगा, बुमराहची स्टाईल पडेल फिकी, सोशल मीडियावर रंगली 'या' 'मिस्ट्री' बॉलरचीच चर्चा; व्हिडिओ एकदा बघाच

Viral Tennis Ball Cricket Video: व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये टेनिस बॉलने क्रिकेटचा सामना खेळला जात असल्याचे दिसत आहे.

Manish Jadhav

Unique Cricket Bowling Action: सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे दररोज नवनवीन आणि अकल्पनीय गोष्टी पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून युजर्सना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तुम्हीही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तुमच्या फीडवर अनेकदा असे हटके व्हिडिओ येत असतील जे त्यांच्या वेगळेपणामुळे व्हायरल होतात. सध्या अशाच एका क्रिकेट सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यातील गोलंदाजाची शैली पाहून क्रिकेटप्रेमी अवाक झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये टेनिस बॉलने क्रिकेटचा (Cricket) सामना खेळला जात असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या मुलाची 'ॲक्शन'. सामान्यतः गोलंदाज आपला हात समोरुन किंवा बाजूने गोल फिरवून चेंडू फेकतात, मात्र या मुलाची पद्धत पूर्णपणे वेगळी आणि चकित करणारी आहे. हा मुलगा चेंडू फेकताना आपला उजवा हात पाठीच्या मागे नेतो आणि चेंडू विरुद्ध दिशेने म्हणजेच डाव्या बाजूने बाहेर काढत समोर फेकतो. व्हिडिओमध्ये तो अशा प्रकारे सलग तीन चेंडू टाकताना दिसतो आणि विशेष म्हणजे हे तिन्ही चेंडू 'डॉट' जातात, ज्यावर फलंदाजाला एकही धाव काढता येत नाही.

हा गोलंदाज नेमका कोण आहे आणि हा सामना कुठे सुरु आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा व्हिडिओ 'X' वर @Mukeshbaitu नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. या व्हिडिओला "भावा, ही कोणती बॉलिंग ॲक्शन आहे?" असे कॅप्शन देण्यात आले. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर मजेशीर आणि कौतुकास्पद कमेंट्स येत आहेत.

एका युजरने "ही तर जबरदस्त ॲक्शन आहे" असे म्हटले, तर दुसऱ्याने "भावाकडे काय कला आहे!" अशा शब्दात त्याचे कौतुक केले आहे. एका युजरने तर चक्क विराट कोहलीचा चष्मा काढून थक्क झाल्याचा 'GIF' शेअर करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अजब गोलंदाजीने सध्या क्रिकेट विश्वात आणि सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचे उधाण आणले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT