Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Viral Train Stunt Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यातल्या छोटी गोष्ट व्हायरल होते. तरुणांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे.

Manish Jadhav

Viral Train Stunt Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यातल्या छोटी गोष्ट व्हायरल होते. तरुणांपासून ते लहानांपर्यंत प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. तुम्हीही जर सोशल मीडियावर वेळ घालवत असाल, तर तुम्हाला माहिती असेल की दररोज अनेक व्हिडिओ पोस्ट होतात आणि त्यापैकी काही क्षणार्धात व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निष्काळजीपणाचे परिणाम किती गंभीर असू शकतात, हे तुम्हाला लक्षात येईल.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय दिसले?

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या ट्रेनला लटकून जीवघेणा स्टंट करताना दिसतो. तो कोणत्याही डब्यात बसलेला नाही, तर दोन डब्यांमधील जागेत एका हाताने पकडून बाहेर लटकलेला आहे. त्याचा दुसरा हात हवेत आहे. लटकलेल्या अवस्थेत तो इकडे-तिकडे पाहत 'हर-हर महादेव' ची घोषणा देतो. त्याचवेळी, अचानक त्याचे तोंड एका खांबाला जोरात धडकते. सुदैवाने, ट्रेनचा वेग कमी होता, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली नाही. अन्यथा, त्याचा जीवही जाऊ शकला असता. ही घटना पाहून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की, हा तरुण आता आयुष्यात अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही आणि हा धडा तो आयुष्यभर विसरु शकणार नाही.

सोशल मीडियावर लोकांची प्रतिक्रिया

हा व्हिडिओ 'एक्स' (X) प्लॅटफॉर्मवर @Rawat_1199 नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये 'लोक किती निष्काळजीपणा करतात' असे लिहिले. ही बातमी लिहिली जाईपर्यंत व्हिडिओला 1 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्संनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले की, "आता त्याला चांगलाच फटका बसला, आता तो पुन्हा असे कधीच करणार नाही." दुसऱ्याने लिहिले की, "बच गया, डोक्याला नाही लागलं असतं तर..." असे म्हणत तो थोडक्यात बचावल्याचे म्हटले. आणखी एका युजरने तर, "बरं झालं, अशा बेजबाबदार लोकांसोबत असेच व्हायला पाहिजे," असे लिहिले.

त्याचवेळी, हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी नाहीतर एक गंभीर इशारा म्हणून समोर आला आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होण्याच्या नादात अनेक तरुण असे जीवघेणे स्टंट करतात. पण यातून मोठा अपघात होऊ शकतो आणि जीवावर बेतू शकते. त्यामुळे अशा स्टंट्सपासून दूर राहणेच योग्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT