Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Viral News: सोशल मीडिया हा आजच्या काळातील सर्वात प्रभावी आणि मनोरंजक प्लॅटफॉर्म बनला आहे. दररोज येथे काहीतरी नवीन, वेगळं आणि अविश्वसनीय पाहायला मिळतं.

Sameer Amunekar

सोशल मीडिया हा आजच्या काळातील सर्वात प्रभावी आणि मनोरंजक प्लॅटफॉर्म बनला आहे. दररोज येथे काहीतरी नवीन, वेगळं आणि अविश्वसनीय पाहायला मिळतं. कधी हसवणारे विनोदी व्हिडिओ, तर कधी मानवी कल्पकतेचे आश्चर्यचकित करणारे प्रयोग सगळंच सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतं. सध्या असाच एक भन्नाट ‘जुगाड’ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. एका व्यक्तीने ट्रॅक्टरला रथाची चाके लावून असा पराक्रम केला आहे की, पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत.

व्हिडिओमध्ये दिसते की त्या व्यक्तीने ट्रॅक्टरची सर्व साधारण चाके काढून त्याऐवजी मोठी रथाची चाके बसवली आहेत. एवढंच नाही, तर त्याने त्या ट्रॅक्टरला चालवतही दाखवलं आहे. रथाच्या मोठ्या, लाकडी चाकांसह ट्रॅक्टर चालताना पाहणे म्हणजे खरोखर एक ‘विस्मयकारक दृश्य’ वाटतं. हा प्रयोग फक्त कल्पकतेचा नमुना नाही, तर भारतीय ‘जुगाड’ संस्कृतीचं उत्तम उदाहरण आहे.

हा व्हिडिओ @himanshuking_143 या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही तासांतच या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत 2.47 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी या भन्नाट कल्पकतेचं कौतुक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका वापरकर्त्याने मजेशीर कमेंट केली,“आता अमेरिका फक्त म्हणत नाही, फक्त पाहतंय!”
तर दुसऱ्याने लिहिलं,“हा नवा भारत आहे,इथे काहीही अशक्य नाही.” तिसऱ्याने तर थेट प्राचीन काळाची आठवण करून दिली, “हे तर प्राचीन भारतासारखं वाटतं, भाऊ!”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Porascade Junction Accident: पोरस्कडे जंक्शनाकडेन भिरांकूळ अपघात

SCROLL FOR NEXT