Moving Train Theft Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Moving Train Theft Viral Video: रेल्वेने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या सामानावर चोरट्यांची नजर असते. मात्र, चोरीचा प्रयत्न करताना एखादा चोरच प्रवाशांच्या तावडीत सापडला तर? दिल्लीमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या सामानावर चोरट्यांची नजर असते. मात्र, चोरीचा प्रयत्न करताना एखादा चोरच प्रवाशांच्या तावडीत सापडला तर? दिल्लीमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये खिडकीतून हात घालून प्रवाशांचे सामान चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला प्रवाशांनी रंगेहात पकडले. विशेष म्हणजे, त्याला पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून प्रवाशांनी त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खिडकीतून हात घातला अन् प्रवाशांनी पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. ट्रेनमध्ये प्रवासी बसलेले असताना एक व्यक्ती खिडकीतून हात आत घालून चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. मात्र, त्याचा हा प्रयत्न प्रवाशांच्या लक्षात आला. खिडकीजवळ बसलेल्या एका प्रवाशाने क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीचा हात पकडला. त्यानंतर डब्यातील इतर प्रवासीही मदतीसाठी पुढे आले. सर्वांनी मिळून त्याचा हात घट्ट धरून ठेवला, जेणेकरून त्याला पळून जाता येणार नाही.

९४ सेकंदांच्या व्हिडिओत नेमकं काय?

या घटनेचा सुमारे ९४ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये रेल्वेच्या खिडकीजवळ काही प्रवासी जमल्याचे दिसते. त्याचवेळी खिडकीच्या बाहेर असलेल्या एका व्यक्तीचा हात डब्याच्या आत दिसतो. प्रवाशांनी त्याचा हात पकडल्यामुळे त्याला स्वतःची सुटका करून घेता येत नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना ट्रेन धावत असतानाच घडत होती. ट्रेन पुढे जात असतानाही प्रवाशांनी त्याची पकड सोडली नाही. व्हिडिओमध्ये एका प्रवाशाचा आवाजही ऐकू येतो. तो दिल्लीतील रेल्वे स्थानकाजवळ चोराला अशा प्रकारे पकडल्याचे सांगताना दिसतो. पुढील स्थानक येईपर्यंत प्रवाशांनी संबंधित व्यक्तीला पकडून ठेवल्याचा दावा व्हिडिओसोबत करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर प्रवाशांच्या धाडसाची चर्चा

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी प्रवाशांच्या सतर्कतेचे आणि एकजुटीचे कौतुक केले आहे. वेळीच लक्ष गेल्यामुळे चोरीचा प्रयत्न हाणून पाडता आला, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. रेल्वे प्रवासात आपले सामान सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सावध राहण्याची गरज असल्याचेही काहींनी म्हटले आहे.

धावत्या ट्रेनमध्ये अशी कृती धोकादायक?

दुसरीकडे, काही नेटकऱ्यांनी प्रवाशांच्या या कृतीबाबत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. धावत्या ट्रेनमध्ये खिडकीबाहेर असलेल्या व्यक्तीचा हात अशा प्रकारे पकडून ठेवणे धोकादायक ठरू शकते. यामुळे संबंधित व्यक्तीबरोबरच ट्रेनमधील प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात न घालता रेल्वे सुरक्षा दल (RPF) किंवा रेल्वे पोलिसांना माहिती देणे अधिक योग्य ठरू शकते. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती खरोखरच चोरीचा प्रयत्न करत होती का आणि या प्रकरणात पुढे काय कारवाई झाली, याबाबत स्वतंत्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: दिलदार केएल राहुल! सामना संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला दिलं सरप्राईज; महागडा फोन केला गिफ्ट

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bicholim: डिचोली मंदिर परिसरात कोसळली झाडाची फांदी, अनर्थ टळला; वीजखांब मोडला, अडीच तास वीजपुरवठा खंडित

Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी' कामांचे 'IPSCDL'कडून समर्थन; आरोप नव्हे, वस्तुस्थिती पाहा; 48 इलेक्ट्रिक बसेस, 362 'सीसीटीव्हीं'चा दाखला

Tuyem Hospital Issues: तुये इस्पितळातील समस्या तातडीने सोडवा, मांद्रे काँग्रेस गट समितीकडून आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर

SCROLL FOR NEXT