Viral video bag snatching Dainik Gomantak
देश

Viral Video: महिलेची बॅग पळवणे चोराला पडले भारी, कार चालकाने रस्त्यावरच केला 'गेम' ओव्हर! पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कर्माची शिक्षा किती तत्काळ मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते.

Sameer Amunekar

सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कर्माची शिक्षा किती तत्काळ मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते. रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला एका कार चालकाने ज्या पद्धतीने धडा शिकवला, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार चालकाची एन्ट्री

व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला रस्त्यावरून पायी चालली आहे. तिला संशयास्पद हालचालींमुळे धोका जाणवतो आणि ती सावध होऊन वेगाने चालू लागते. इतक्यात एक दुचाकीस्वार तिथे येतो आणि महिलेच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ही घटना जवळून पाहणाऱ्या एका कार चालकाने क्षणार्धात परिस्थिती ओळखून आपल्या कारने चोरट्याच्या दुचाकीला धडक दिली.

बॅग सोडून जीव वाचवण्याची धडपड

कारच्या धडकेमुळे चोरटा खाली पडतो, तरीही तो हार मानत नाही. तो पुन्हा बाइक उठवून पळण्याचा प्रयत्न करतो, पण कार चालक त्याला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. कार चालकाने पुन्हा एकदा आपल्या गाडीने चोरट्याला गाठले आणि रोखले. स्वतःचा बचाव आणि पकडले जाण्याच्या भीतीने अखेर चोरट्याला ती हिसकावलेली बॅग तिथेच सोडून तिथून पळ काढावा लागला. कार चालकाने काही अंतर रिव्हर्स गिअरमध्ये गाडी चालवत चोरट्याचा पाठलाग केला, जे पाहून उपस्थितांचे डोळे विस्फारले.

सोशल मीडियावर कार चालकाचे कौतुक

जरी चोरटा शेवटी पळून जाण्यात यशस्वी झाला असला, तरी या कार चालकाच्या धैर्याने अनेकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर @ShagunX_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु कार चालकाच्या या तत्परतेमुळे एक मोठी चोरी टळली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT