Viral Video Shows In Punjabs Mansa a man was attacked by goons. Dainik Gomantak
देश

Watch Video: बाप मार खातोय अन् चिमुकला रडतोय; हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल

यावेळी हल्लेखोरांपैकी एकाने मुलाला त्याच्या वडिलांपासून वेगळे केल्यानंतर मुलगा भीतीने जोरजोरात रडू लागला.

Ashutosh Masgaunde

Viral Video Shows In Punjabs Mansa a man was attacked by goons:

पंजाबमधील मानसा येथे मुलाला शाळेत सोडायला चाललेल्या एका व्यक्तीवर काही गुंडांनी दिवसाढवळ्या हल्ला केला.

हल्ला करणाऱ्या एकूण सहा जणांपैकी काही जण आधीच घटनास्थळी हजर होते तर काही जण त्या व्यक्तीच्या दुचाकीचा पाठलाग करत आले.

या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीला काही जण काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तर या व्यक्तीचा मुलगा बाप मार खाताना पाहत जोरजोरात रडत आहे.

या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याचे समजते.

वडील आपल्या मुलाला त्याच्या मानसा येथील शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरुन चालले होते. ते शाळेजवळ पोहचले असता पाच चे सहा जणांच्या एका गटाने त्यांच्यावर हल्ला केला.

यावेळी हल्लेखोरांपैकी एकाने मुलाला त्याच्या वडिलांपासून वेगळे केल्यानंतर मुलगा भीतीने जोरजोरात रडू लागला.

ही एका शाळेच्या समोर घडली असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी इतर पालक आपल्या मुलांना तिथे सोडत आहेत आणि त्यांना आत पाठवत आहेत असे दृश्यांमध्ये दिसत आहे.

वडिलांनी घटनास्थळी येऊन आपल्या मुलाला सोडण्यासाठी त्यांची गाडी थांबवताच, सुरुवातीला त्यांची कॉलर धरून जमिनीवर ओढल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर लाठ्याकाठ्याने हल्ला केला.

यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने हस्तक्षेप करून पीडित वडिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक वैमनस्यातून या व्यक्तीला गंभीर जखमी केल्यानंतर हल्लेखोर जेथून पळून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

SCROLL FOR NEXT