Kolkata HC News: पत्रकार सुधीर चौधरी यांच्याविरोधातील हेट स्पीटचा खटला रद्द; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय

पुरावे सादर करण्यात अपयश
Kolkata HC News
Kolkata HC NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Kolkata HC News: कोलकाता उच्च न्यायालयाने एका निर्णयात झी न्यूजचे माजी संपादक सुधीर चौधरी, या वृत्तवाहीनीची पत्रकार पूजा मेहता, कॅमेरापर्सन तन्मय मुखर्जी यांच्याविरोधातील हेट स्पीचचा खटला रद्द केला आहे. 2016 मध्ये पुजा मेहता विरूद्ध पश्चिम बंगाल हा खटला दाखल झाला होता.

2016 मध्ये बंगालमधील धुलागड दंगलीचे वार्तांकन करताना या तिघा पत्रकारांनी दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवेल, असे वार्तांकन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kolkata HC News
World Lion Day 2023: देशातील सिंहांच्या संख्येत सातत्याने वाढ; जागतिक सिंह दिनानिमित्त PM मोदींनी केले 'हे' आवाहन...

तथापि, कोलकाता न्यायालयाने 3 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती बिभास रंजन डे यांनी म्हटले आहे की, या खटल्यात धर्म, वंश, स्थान या आधारे विविध गटांमधील जातीय शत्रुत्वाला प्रोत्साहन देण्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करता आला नाही.

तपास अधिकाऱ्यांना 51 दिवसांच्या कालावधीत केवळ दोन व्यक्तींचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात यश आले आहे. दोन्ही स्टेटमेंट्स एकसारखीच आहेत. दोन्ही साक्षीदारांनी दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याच्या उद्देशाने काही बोलल्याचे दिसत नाही.

एफआयआरमध्ये म्हटले आहे की, 16 डिसेंबर 2016 नंतर चौधरी आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट दिली तेव्हा कोणतीही अनुचित घटना घडली नाही. हा खटला सुरू ठेवल्यास न्यायालयाच्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यासारखे होईल, त्यामुळे हा खटला रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही," असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

Kolkata HC News
Video Banking Service: बॅंकिंग क्षेत्रात क्रांती! आता व्हिडिओ बँकिंगद्वारे घर बसल्या मिळणार ग्राहकांना सेवा

चिरंजीत दास यांनी याविरोधात तक्रार केली होती. त्यावरून १७ डिसेंबर २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दास यांनी आरोपात म्हटले होते की, संबंधित पत्रकारांच्या वार्तांकनामुळे धुलागड येथे धार्मिक तणाव निर्माण झाला.

त्यावर तिघाही पत्रकारांनी एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. वार्तांकन सर्वांनी केले, पण केवळ झी न्यूजला दोषी धरले जात आहे, असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या याचिकेवर त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com