Viral Video Shopkeeper Dainik Gomantak
देश

Viral Video: खुर्ची विकण्यासाठी दुकानदाराचा भन्नाट कारनामा; आधी आपटली, मग उड्या मारल्या अन् शेवटी चक्क डान्स केला! पाहा व्हिडिओ

Viral Video Shopkeeper: खुर्ची विकण्यासाठी दुकानदार अनेक प्रकारच्या जाहिरात कल्पना वापरताना आपण पाहतो.

Sameer Amunekar

खुर्ची विकण्यासाठी दुकानदार अनेक प्रकारच्या जाहिरात कल्पना वापरताना आपण पाहतो. मात्र, एखाद्या प्लास्टिकच्या खुर्चीची मजबुती सिद्ध करण्यासाठी त्यावर उड्या मारणे, पाय आपटणे आणि त्याच खुर्चीवर चक्क डान्स करणे, असा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. सोशल मीडियावर सध्या एका खुर्ची विक्रेत्याचा असाच भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असून, त्याची विक्री करण्याची पद्धत पाहून नेटकरीही चांगलेच हसत आहेत.

खुर्चीची मजबुती तपासण्याचा अनोखा प्रयोग

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत असून त्याच्यासमोर प्लास्टिकची हलकी दिसणारी खुर्ची आहे. ही खुर्ची किती मजबूत आहे, हे दाखवण्यासाठी तो वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो. सुरुवातीला तो खुर्चीला हाताने जोरजोरात आपटून तिची मजबुती तपासतो. त्यानंतर तो थेट खुर्चीवर चढतो आणि आपले संपूर्ण वजन सीटवर टाकून उभा राहतो.

खुर्चीवर चढून मारल्या चक्क उड्या

मात्र, दुकानदाराचा हा डेमो इथेच थांबत नाही. खुर्चीवर उभे राहिल्यानंतर तो त्यावर उड्या मारायला सुरुवात करतो. स्वतःचे वजन वारंवार खुर्चीवर टाकून तो तिची क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करतो. खुर्चीचे पाय वजनामुळे वाकताना आणि लचकताना स्पष्टपणे दिसतात. मात्र, तरीही खुर्ची तुटत नाही.

शेवटी खुर्चीवरच सुरू केला डान्स

यानंतर विक्रेत्याने जे केले, ते पाहून नेटकरीही थक्क झाले. त्याने चक्क खुर्चीवर उभे राहून डान्स करण्यास सुरुवात केली. कधी तो एका बाजूला वजन टाकतो, तर कधी दुसऱ्या बाजूला जातो. त्याच्या या कृतीमुळे हा साधा खुर्चीचा डेमो न राहता एखाद्या लाइव्ह स्ट्रेस टेस्टसारखा वाटू लागतो.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ एक्सवरील साजिद त्यागी नावाच्या युजरने शेअर केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या माहितीनुसार, हा दुकानदार त्यांच्या परिसरात खुर्ची विकण्यासाठी आला होता. खुर्ची किती मजबूत आहे हे ग्राहकांना पटवून देण्यासाठी त्याने स्वतःच तिच्यावर विविध प्रकारचे प्रयोग करून दाखवले.

व्हिडिओ शेअर करताना साजिद यांनी या विक्रेत्याच्या पद्धतीची मजेशीर शैलीत चर्चा केली. इतके प्रयोग केल्यानंतरही खुर्ची तुटली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची असती, असा विनोदही त्यांनी केला. तसेच, या खुर्चीची किंमत किती असेल, याचा अंदाज लावण्यास नेटकऱ्यांना सांगितले.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. काहींनी दुकानदाराच्या विक्री कौशल्याचे कौतुक केले, तर काहींनी त्याच्या अनोख्या डेमोची खिल्ली उडवली. काही यूजर्सनी मात्र या प्रकारामागे खुर्चीच्या रचनेशी संबंधित विशिष्ट तंत्र किंवा वजनाचे संतुलन असू शकते, असेही म्हटले आहे.

एकंदरीत, खुर्ची विकण्यासाठी केलेल्या या भन्नाट डेमोने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली आहे. ग्राहकांना उत्पादनाची मजबुती दाखवण्यासाठी दुकानदाराने केलेला हा अनोखा प्रयोग सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

Goa Politics: पक्षांतर, सरकारी 'खोगीरभरती' अन् बेरोजगारीवर घणाघात! मतदारांनी आता जाब विचारावा; 2027ची विधानसभा निवडणूक ठरवणार गोव्याच्या राजकारणाची दिशा?

Asian Games Semi Final 2026: शेफालीचं धडाकेबाज शतक, दीप्ती-नंदनीचा घातक मारा! बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक; गोल्डसाठी श्रीलंकेशी भिडणार

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार? तज्ज्ञांच्या विविध पर्यायांवर चर्चा, अंतिम निर्णय

Houthi Saudi Conflict: सौदी अरेबियानंतर कुणाचा नंबर? हूतींच्या धमकीमुळे पाकिस्तान-तुर्कीच्या गोटात घबराट; म्हणाले, ''परकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही!" VIDEO

SCROLL FOR NEXT