Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: आधी पठ्ठ्यानं रॅपिडो रायडरला फोन करुन बोलावलं अन् नंतर असं काम करुन घेतलं... सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Rapido Driver Viral Video: सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ रॅपिडो ड्रायव्हरने बनवला आहे.

Manish Jadhav

Rapido Driver Viral Video: आजच्या काळात प्रत्येकजण सोशल मीडियावर आहे. जवळजवळ प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे, ज्यामध्ये 2-3 सोशल मीडिया अॅप्स उपलब्ध आहेत. बरेच लोक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, तर काही लोक सोशल मीडियावर कमी दिसतात, परंतु ते देखील सोशल मीडियावर (Social Midea) सक्रिय असतात. जर तुम्ही देखील सक्रिय असाल तर तुम्हाला माहित असेल की, दररोज लोक सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करतात, त्यापैकी बरेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ रॅपिडो ड्रायव्हरने बनवला आहे. तो एका व्यक्तीकडे जातो आणि त्याच्यासोबत त्याने रॅपिडो बुक केल्याची पुष्टी करतो. त्यानंतर, तो माणूस सांगतो की, त्याच्या बाईकमधील पेट्रोल संपले आहे. त्यावर रॅपिडो ड्रायव्हर त्याला विचारतो की, तू माझ्यासोबत येतो का? त्यावर तो म्हणतो की, त्याला त्याची बाईक ओढावी लागेल. आता हे ऐकून, रॅपिडो ड्रायव्हर नकार देतो आणि म्हणतो की, हे शक्य होणार नाही, ही बुलेट आहे. त्यावर तो माणूस म्हणतो की, पेट्रोल पंप जवळच आहे, मग रॅपिडो ड्रायव्हर त्याच्या बाईकला पाठीमागून पाय लावतो आणि ती पेट्रोल पंपाकडे घेऊन जातो. त्यानंतर बुलेट ड्रायव्हर त्याला पैसे देतो.

तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ shubham.parmarvlogs नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. ही बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, 89 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने कमेंट करत लिहिले की, असे दिसते की भावाचा शहरात कोणीही मित्र नाही. दुसऱ्याने लिहिले की, त्याने अगदी चतुरपणे मेंदूचा वापर केला. मी कधीही असा विचार केला नसता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Conversion: भू-रुपांतरे थांबवा, प्रादेशिक आराखडा बनवा! नागरिकांचा सूर; विधानसभा अधिवेशनाकडे लक्ष

UTAA Controversy: 'ST बांधवांवर केलेल्या अन्‍यायाला वाचा फोडण्‍यासाठी गावागावांत जाऊ'! वेळीप यांचा भाजपातून राजीनामा देण्‍यास नकार

Konkan Railway: कोकण रेल्‍वेकडून प्रवाशांची फसवणूक! मार्गावर कमी डब्‍यांच्‍या गाड्या; तिकिटासाठी होतेय दमणूक

Goa Politics: गोव्यात राजकारणाला ‘उकळी’! काँग्रेस, फॉरवर्ड नरम-गरम; कुडचडेत एकाच दिवशी मेळावे

Rashi Bhavishya 08 June 2025: आत्मविश्वास वाढेल, महत्त्वाच्या गोष्टींचा निकाल तुमच्या बाजूने लागेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

SCROLL FOR NEXT