
एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण धबधब्याच्या मध्यभागी असलेल्या खडकाच्या काठावर उभा असल्याचे दिसते. त्याची प्रेयसीही त्याच्यासोबत निसर्गाचा आनंद घेताना आणि धबधब्याचे सौंदर्य अनुभवताना दिसते.
काही क्षणांनंतर, तो तरुण गुडघ्यावर बसून आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, याच क्षणी अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो थेट धबधब्याच्या जोरदार प्रवाहात पडतो. पाहता पाहता तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो. जवळच उभी असलेली त्याची प्रेयसी मात्र काहीच करू शकत नाही आणि ती केविलवाण्या नजरेनं आपल्या प्रिय व्यक्तीकडे पाहत राहते.
हा व्हिडिओ @MarchUnofficial नावाच्या एका हँडलवरून शेअर करण्यात आला असून, तो सोशल मीडियावर अनेकांनी फॉरवर्ड आणि कमेंट्ससह शेअर केला आहे. मात्र या घटनेचे नेमके ठिकाण स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देताना काळजी व्यक्त केली आहे. काही युजर्सनी ही घटना ‘कलयुग मोहब्बत’ असे संबोधले आहे, तर काहींनी अशा धोकादायक ठिकाणी प्रपोज करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
एका युजरने लिहिले की, “प्रेमामुळे माणूस अंध होतो, पण अशा ठिकाणी योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक असते.” तर दुसऱ्याने म्हटले, “हे साहस नव्हते, तर मूर्खपणा होता. स्वतःच्या जीवाच्या किंमतीवर प्रपोज करण्याचा काय अर्थ आहे?”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.