Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: जंगली जीवनाचा थरार! अजगराने दोन बेडूक गिळले, पण लोभ नडला; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

Viral Animal Video: पावसाळ्यामध्ये हिरवळीसोबतच जंगली जीव (Wild Animals) देखील अधिक सक्रिय होतात.

Manish Jadhav

Viral Animal Video: पावसाळ्यामध्ये हिरवळीसोबतच जंगली जीव (Wild Animals) देखील अधिक सक्रिय होतात. अशाच एका घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. एका अजगराने (Python) भूक लागल्यामुळे एकापाठोपाठ दोन मोठे बेडूक (Frogs) गिळले, पण अति खाण्यामुळे त्याची अवस्था इतकी वाईट झाली की त्याला उलटी (Vomiting) करावी लागली. अंगावर रोमांच उभा करणारा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दोन बेडूक गिळल्यानंतर काय झाले?

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एका अजगराने दोन मोठे बेडूक गिळले आहेत. त्याने आधी एक बेडूक गिळला आणि न थांबता लगेच दुसराही गिळला. पण लवकरच त्याला आपल्या या चुकीची जाणीव झाली आणि काही वेळातच त्याची तब्येत बिघडली. स्वतःची अवस्था खराब होत असल्याचे पाहून त्याने दोन्ही बेडकांना उलटी करुन बाहेर काढले. व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते की, दोन्ही बेडूक त्याच्या पोटासाठी खूप जड झाले होते, त्यामुळे त्याला ते पचवता आले नाहीत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, "हे पाहून माझ्या अंगावर रोमांच उभा राहिला! अजगराने इतका लोभ करायला नको होता." दुसऱ्याने लिहिले, "अजगराला वाटले की, दोन बेडूक म्हणजे फक्त नाश्ता आहे, पण पोटाने सांगितले, 'थांब बाबा, एवढे पचणार नाही!'" अनेकांनी या घटनेला निसर्गाचा एक अनोखा धडा म्हटले आहे, जो हे शिकवतो की प्रत्येक जीवाची एक मर्यादा असते.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @cobra_lover_suraj नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे आणि तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

Goa Live News: देवसडा- धारबांदोडा अपघात; पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

SCROLL FOR NEXT