Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'तडपाओगे तडपा लो...!’ चिमुकलीनं गायलं लतादीदीचं गाणं, क्यूटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं; सोशल मीडियवर धूमाकूळ

Little Girl Viral Video: 'तडपाओगे तडपा लो! हम तडप-तडप के भी तुम्हारे गीत गाएंगे…!' इन्स्टाग्राम रील्सवर हे गाणे तुम्ही अनेकदा ऐकले असेल.

Manish Jadhav

Little Girl Viral Video: 'तडपाओगे तडपा लो! हम तडप-तडप के भी तुम्हारे गीत गाएंगे…!' इन्स्टाग्राम रील्सवर हे गाणे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. कपल्सपासून ते सिंगलपर्यंत अनेक लोकांनी या गाण्यावर अतिशय सुंदर व्हिडिओ बनवले आहेत. पण आता एका चिमुकलीने याच गाण्यावर अतिशय गोड परफॉर्मन्स देऊन यूझर्सचे मन जिंकले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

चिमुकलीचे गोंडस गाणे व्हायरल

इन्स्टाग्रामवर @khadee_ja_ramees__ नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये ही चिमुकली अतिशय गोड अंदाजात 'तडपाओगे तडपा लो' हे गाणे गाताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की- 'तडपा लो नाही, तडपलम'. या कॅप्शनवरुन हे स्पष्ट होते की, चिमुकलीने हे गीत स्पष्टपणे गायले नाही. मात्र, तिच्या निरागस आणि गोंडस गाण्याच्या (Song) शैलीमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर पहिल्याच नजरेत प्रेम केले आहे.

व्हिडिओमधील चिमुकली गात असतानाचे तिचे निरागस हावभाव आणि हसरा चेहरा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या गोड आवाजाने आणि साधेपणाने लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यूझर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. शेकडो यूझर्संनी या व्हिडिओवर मजेशीर आणि प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले की, "हा व्हिडिओ का संपत नाहीये? मी तर फक्त तिला इतके गोड गाताना बघतच आहे." दुसऱ्या एका यूझरने कमेंट केली, "एकदा पुन्हा गा!" तिसऱ्या यूझरने लिहिले की, "तडपलम, आणि सोबतच ठुकरालम्." तर एका यूझरने म्हटले, "तिच्या आवाजाने तर हे गाणे आणखीनच भावनिक झाले आहे."

गाण्याचा ऐतिहासिक संदर्भ

विशेष म्हणजे, हे गाणे 1959 मध्ये आलेल्या 'बरखा' या हिंदी चित्रपटातील आहे. या गाण्याचे गीत राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते आणि संगीत चित्रगुप्त यांनी दिले होते. या गाण्याला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने आणखीनच सुंदर बनवले होते. हे गाणे त्या काळातील अभिनेत्री शोभा खोटे आणि अनंत कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या चित्रपटात अभिनेत्री नंदा आणि अभिनेता जगदीप यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. एका जुन्या गाण्यावर चिमुकलीने दिलेला हा गोड परफॉर्मन्स आता सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: काळजी घ्या! पाऊस पुन्हा गोव्यात, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट', 6 दिवस जोरदार कोसळणार

SL Bhyrappa Passed Away: प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन; वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Crime: सरकारी अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, लंडनला गेला पळून; वर्षभराने संशयिताला कलकत्त्यात अटक

Codar: "देवा राखणदारा, IIT Project फाटी घें" कोडार ग्रामस्थांनी देवाला घातले ‘गाऱ्हाणे’; सरपंचाच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा इशारा

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर भैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

SCROLL FOR NEXT