Viral Video Dainik Gomantak
देश

VIDEO: धक्कादायक! मोकाट कुत्र्याच्या शेपटीला बांधून तरुणाने फोडले फटाके; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: रस्त्यावरील निष्पाप कुत्र्याच्या शेपटीला फटाका बांधताना एक तरुण कॅमेऱ्यात कैद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. रस्त्यावरील निष्पाप कुत्र्याच्या शेपटीला फटाका बांधताना एक तरुण कॅमेऱ्यात कैद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्सकडून या तरुणावर कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. दिवाळी साजरी करण्याच्या नादात तरुणाने जाणूनबुजून मुक्या प्राण्याला इजा पोहोचवली. त्याने निष्पाप कुत्र्याच्या शेपटीला फटाका बांधून तो पेटवला. या घटनेत कुत्रा जखमी झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून यूजर्स या नराधमाची ओळख उघड होईपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचे आवाहन करत आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हा नराधम कुत्र्याच्या शेपटीला फटाका बांधतो आणि नंतर चेतवतो. व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्ती कुत्र्याचा कान धरुन बसलेला दिसतोय.

फटाका फुटताच कुत्रा घाबरुन जीव वाचवण्यासाठी धावत असताना फटाक्यामधून ठिणग्या बाहेर पडताना दिसत आहेत. कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधणाऱ्या या नरधमालाही अशीच वागणूक देण्याची मागणी सोशल मीडिया यूजर करत आहेत. सोशल मीडिया यूजर्सपैकी एकाने X वर हा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने म्हटले की, "अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. या मुक्या प्राण्याने या b*****d चे काय नुकसान केले आहे? जर असाच फटका त्याच्या पाठीमागच्या भागाला लावला तर मग कळेल त्याला काय वेदना होतात.''

दरम्यान, PETA इंडियाने X वर व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर्सकडे व्हायरल व्हिडिओसंबंधी अधिक माहिती मागितली आहे. PETA इंडियाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "कृपया आमच्या आपत्कालीन क्रमांक 98201 22602 वर आम्हाला कॉल करा आणि घटनेबद्दल तपशीलवार माहिती द्या किंवा तुमचा नंबर द्या जेणेकरुन आम्ही तुमच्याशी संपर्क करु शकू."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live Updates: पर्यावरणीय मान्यता देण्यास प्राधिकरणाचा नकार, कायदेशीर रेती उत्खननाला होणार पुन्हा विलंब!

IFFI Goa 2024: इफ्फी प्रतिनिधींसाठी खास इलेक्ट्रीक बससेवा, रिक्षाचीही मोफत सोय; जाणून घ्या रुट

Saint Francis Xavier Exposition: 10 वर्षानंतर पहिल्यांदाच समोर आले संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव; पाहा पहिली झलक

IFFI Goa 2024: "केवळ पैसा असला म्हणजे चित्रपट बनवता येत नाही"; शेखर कपूर असं का म्हणाले?

Karnataka Accident: डोळ्यासमोर वडिलांचा मृत्यू, मुलगा बचावला; मंगळुरू-बंगळुरू महामार्गावर अपघातात गोव्यातील सख्खे भाव ठार

SCROLL FOR NEXT