Delhi Metro Viral Video
Delhi Metro Viral VideoDainik Gomantak

Delhi Metro Viral Video: 'अंग लगा दे रे'! दिल्ली मेट्रोमध्ये तरुणी झाल्या रोमँटिक; पाहा व्हिडिओ

Delhi Metro: दिल्ली मेट्रोमधील दोन मुलींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये रील बनवण्याबाबत अनेक वाद झाले आहेत.
Published on

Delhi Metro Girl Viral Video:

दिल्ली मेट्रोमधील दोन मुलींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमध्ये रील बनवण्याबाबत अनेक वाद झाले आहेत. डीएमआरसीने अशाप्रकारच्या रील बनवण्यावरुन अनेकदा कडक कारवाई देखील केली आहे. परंतु लोक रील बनवणं सोडायला तयार नाहीत. आता होळीपूर्वी मुलींचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुली मेट्रोमध्ये 'आंग लगा दे रे' गाण्यावर रील बनवत आहेत.

मेट्रोमध्ये दोन मुलींनी काय केलं?

दरम्यान, मेट्रोमध्ये 'आंग लगा दे रे' गाण्यावर या मुली एकमेकांना रंग लावताना रोमॅंटिक झाल्याच्या स्पष्टपणे व्हिडिओ दिसत आहेत. मुलींचा हा रोमॅंटिक डान्स पाहून मेट्रोमधून प्रवास करणारे प्रवासीही थक्क झाले. दोन्ही मुली एकमेकांसोबत रोमँटिक डान्स करत आहेत, ज्याला पाहून लोक पाठ फिरवताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक प्रश्न विचारत आहेत की, या मुली मेट्रोत रंग घेऊन कशा गेल्या, तर काहीजण म्हणत आहेत की, हा रील बनवण्याचा रोग देशाला कुठे घेऊन जाईल.

Delhi Metro Viral Video
Viral Video: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून मॉलमध्ये राडा, पत्नीने पतीसह दुसऱ्या महिलेलाही धुतले

सोशल मीडिया यूजर्स म्हणाले...

एकाने लिहिले की, या मेट्रोतून प्रवास करणारे लोक भाग्यवान आहेत, आमच्यासमोर मेट्रोमध्ये फक्त भांडणे होतात. दुसऱ्याने लिहिले की, हे सर्व सुसंस्कृत समाजासाठी धोकादायक आहेत. तिसऱ्याने लिहिले की, ताईला असे वर्तन का करावेसे वाटले हे समजून घेतले पाहिजे. चौथ्याने लिहिले की, सुसंस्कृत समाजात वागत असताना काहीतरी मर्यादा पाळल्या पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी काय चालले आहे? त्यांना रोखणारे कोणी नाही का?

पाचव्याने लिहिले की, दिल्ली मेट्रोचे अधिकारी, तुमच्याकडे असे नाटक थांबवण्यासाठी काही ठोस पर्याय नाहीत का? सहाव्याने लिहिले की, सोशल मीडियावर लोक राग व्यक्त करत आहेत पण या मेट्रोमध्ये बसलेले लोक त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. सातव्याने लिहिले की, या मुलींना दंड ठोठावण्यात यावा आणि मेट्रोमध्ये प्रवास करण्यास बंदी घालावी. दरम्यान, हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com