Viral Bike Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन आणि अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी एखाद्या व्यक्तीचा विचित्र पोशाख, तर कधी त्यांची अनोखी कल्पना इंटरनेटवर धुमाकूळ घालते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्याने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने आपली साधी सायकल अशी काही 'जुगाड' करुन तयार केली आहे की ती पाहिल्यावर ती बाईक आहे की सायकल, हे ठरवणे कठीण झाले आहे. या अनोख्या क्रिएटिव्हिटीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून, यावर मजेदार प्रतिक्रियाही येत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक तरुण बाईकसारखे दिसणाऱ्या वाहनावर बसून रस्त्यावरुन जाताना दिसतो. दूरुन पाहिल्यावर कुणालाही वाटेल की तो एक तरुण आपल्या बाईकवरुन जात आहे. विशेष म्हणजे त्याने हेल्मेटही घातलेले नाही, ज्यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला वाटले की, तो वाहतुकीच्या (Transport) नियमांचे उल्लंघन करत आहे. मात्र, जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती त्याच्या जवळ जाते, तेव्हा मोठा खुलासा होतो. त्या 'बाईक'ला बाईकचा स्टँड नसून, सायकलचा स्टँड लावलेला दिसतो.
या स्टँडकडे लक्ष दिल्यानंतर काही क्षणांतच धक्का बसतो. समोरुन बाईकसारखे दिसणारे ते वाहन प्रत्यक्षात एक सायकल आहे. त्या तरुणाने आपल्या साध्या सायकलवर बाईकसारखी बनावट बॉडी फ्रेम बसवली आहे. या बॉडीवर हेडलाइट, पेट्रोल टँक आणि सीटची रचना अशी काही केली आहे की, ती बाईकच असल्याचा भास होतो. या अनोख्या 'जुगाडामुळे' हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @RamsharmaGuna नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शनमध्ये लिहिले की, "आता वाहतूक पोलीसही गोंधळले आहेत. याला चलन (Challan) द्यायचे की त्याची हवा काढून टाकायची?" या मजेशीर कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आणि लोकांनी यावर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारतात 'जुगाड'ला एक वेगळेच महत्त्व आहे. कमी खर्चात आणि उपलब्ध साधनांचा वापर करुन कोणतीही समस्या सोडवण्याच्या या कल्पनाशक्तीचे कौतुक केले जाते. या व्हिडिओमध्येही तेच दिसले. एका युजरने कमेंट करताना लिहिले की, "वाह! काय जबरदस्त जुगाड आहे यार!" तर दुसऱ्याने लिहिले, "भारतात (India) जुगाडाची काहीच कमी नाही." आणखी एका युजरने तर थेट म्हटले, "याला तर देशभक्तीच्या नावाने सोडूनच द्यायला हवं!" अशा प्रकारच्या कमेंट्सने हा व्हिडिओ आणखीच लोकप्रिय झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.