Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: हातचलाखीचा मास्टर! मासे चोरण्याचा 'जुगाड' सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, ''गजब का टोपीबाज है''

Viral Theft Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज नवनवीन आणि आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Manish Jadhav

Viral Theft Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज नवनवीन आणि आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये लोकांचे अनोखे जुगाड, अतरंगी स्टंट्स आणि विनोदी कल्पकता पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने चोरी करण्यासाठी लावलेली अविश्वसनीय शक्कल पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

चोरट्याचा 'मासे खरेदी'चा दिखावा

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये माशांच्या एका दुकानात ही संपूर्ण घटना कैद झाली. दुकानातील वेगवेगळ्या बॉक्समध्ये मासे ठेवलेले आहेत आणि एक महिला तिथे मासे खरेदीसाठी उभी आहे. याचवेळी एक व्यक्ती दुकानात प्रवेश करतो. त्याने जाणीवपूर्वक त्याचा एक हात शर्टच्या आत लपवलेला असतो, ज्यामुळे तो 'दिव्यांग' असल्याचा भास होतो. तो तिथे मासे खरेदीदार असल्याचा देखावा करतो. तो एका बॉक्समधील मासा उचलतो, तो व्यवस्थित वास घेऊन परत ठेवून देतो आणि तिथून निघून जाण्याची तयारी करतो. मात्र, बाहेरुन 'दिव्यांग' भासणाऱ्या या व्यक्तीचा दुसरा हात शर्टाच्या आत सक्रिय असतो. तो त्याच लपवलेल्या हाताने एक मोठा मासा उचलतो, शर्टाच्या आत लपवतो आणि मोठ्या चलाखीने तिथून निघून जातो.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्यक्तीच्या चोरी करण्याच्या अनोख्या 'जुगाडा'वर नेटकऱ्यांनी आश्चर्य आणि मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 'love_sutta' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे आणि बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 45 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

एका युजरने या घटनेवर कमेंट करताना लिहिले, "हा हल्ला अचानक झाला (हमला अचानक से हुआ)।"

दुसऱ्या युजरने या चलाखीला दाद देत म्हटले, "गजब टोपीबाज आहे (गजब टोपीबाज है)।"

आणखी एका युजरने लिहिले की, "हे खूप खतरनाक आहे (बहुत खतरनाक)।"

या व्हिडिओमुळे हे सिद्ध होते की, चोरी करण्यासाठी लोक कशा प्रकारे नवनवीन आणि धक्कादायक क्लृप्त्या वापरु शकतात. मात्र, ही चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याने या व्यक्तीचा 'जुगाड' आता सोशल मीडियावर जगजाहीर झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT