Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

Triple Riding Drunk Video: सध्याच्या काळात सोशल मीडिया वापरणे खूप सामान्य झाले आहे. फावल्या वेळेत लोक व्हिडिओ स्क्रोल करत बसलेले अनेकदा दिसतात.
Triple Riding Drunk Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Triple Riding Drunk Video: सध्याच्या काळात सोशल मीडिया वापर खूप सामान्य झाला आहे. फावल्या वेळेत लोक व्हिडिओ स्क्रोल करत बसलेले अनेकदा दिसतात. सोशल मीडियावर दररोज मजेशीर किंवा धक्कादायक व्हिडिओ क्षणात व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे, जो दारुच्या नशेत वाहन चालवणे किती धोकादायक आहे हे दर्शवतो.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Triple Riding Drunk Video
VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

नशेतील स्टंट आणि अपघात

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन तरुण एकाच स्कूटीवर प्रवास करताना दिसतात. ही स्कूटी चालवणारा तरुण रस्त्यात अचानक स्कूटी 'लहरवण्याचा' (Zig-zag) प्रयत्न करतो. मात्र, वेगामुळे आणि कदाचित नशेत असल्यामुळे तोल सांभाळता न आल्याने त्यांची स्कूटी रस्त्यावर घसरते आणि तिघेही खाली पडतात.

'बीअर'ची प्राथमिकता

या अपघातादरम्यान (Accident) एक अत्यंत विनोदी आणि धक्कादायक दृश्य पाहायला मिळते. सर्वात मागे बसलेल्या तरुणाच्या हातात बीअरचा कॅन असतो. तो स्कूटीवरुन पडला तरी, कॅन मात्र हाताने खाली पडू देत नाही. तो कॅन तसाच पकडून शांतपणे उठतो आणि रस्त्याच्या बाजूला जातो. त्याच्यासाठी कॅन वाचवणे ही प्राथमिकता असल्याचे दिसते. यानंतर दुसरा तरुणही स्वत:हून उठतो आणि बाजूला सरकतो. अपघात पाहूनही मदतीसाठी कोणीही धावून येत नाही.

सर्वात शेवटी स्कूटी चालवणारा तरुण उठतो, स्कूटी उचलतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा तोल पुन्हा जातो आणि तो खाली कोसळतो. त्यानंतर मात्र एक व्यक्ती त्याची मदत करण्यासाठी पुढे येतो.

Triple Riding Drunk Video
Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

हा व्हिडिओ 'drunken.raipur' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्याला लाखो लोकांनी लाईक केले असून त्यावर अनेक गमतीशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

  • एका युजरने 'भाईने बीअर नाही सोडली' असे लिहून या तरुणाच्या प्राधान्यक्रमावर उपहास केला आहे.

  • दुसऱ्या युजरने 'आणि भाऊ, आली का मजा?' अशी कमेंट केली.

  • एकाने 'प्यायची तर अशी प्या' असे उपरोधिकपणे म्हटले.

  • तर अनेकांनी 'पापाची परी नाही, पापाचा परा' अशा शब्दात तरुणांच्या या बेजबाबदार वृत्तीवर टीका केली.

हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाचा विषय ठरला नसून, सार्वजनिक ठिकाणी अशा बेदरकारपणे आणि नशेत वाहन चालवण्याच्या धोकादायक सवयीकडे गंभीर लक्ष वेधतो. अशा स्टंटबाजीमुळे केवळ स्वतःचाच नाही, तर इतरांचा जीवही धोक्यात येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com