Viral Video: खाऊसाठी दोन खारुताईंमध्ये गोड मारामारी; ये व्हिडिओ आपका दिन बना देगा Watch

Social Media Viral Video: हा व्हिडिओ कोणत्याही रिलस्टार किंवा सेलेब्रिटींचा अथवा सिनेमातील नाही तर हा व्हिडिओ दोन खारुताईंचा आहे.
Squirrels viral video | News
Adorable animal momentsDainik Gomantak
Published on
Updated on

इंटरनेटच्या जमान्यात काय व्हायरल होईल याचा काही भरोसा नाही. लाखो रिल्स, शॉर्ट्स विविध सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इंटरनेट युझर्सकडून देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना आवडणारे व्हिडिओ शेअर केले जातात. इंटरनेटवर प्रामुख्याने कॉमेडी व्हिडिओंचा धुमाकूळ सुरु असतो. असाच एक तुम्हाला हसवणारा, हलका - फुलका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गंमत म्हणजे हा व्हिडिओ कोणत्याही रिलस्टार किंवा सेलेब्रिटींचा अथवा सिनेमातील नाही तर हा व्हिडिओ दोन खारुताईंचा आहे. दोन खारुताई खाऊ साठी गोड भांडण करताना दिसत आहेत. खाऊसाठी त्यांच्यात हलकी मारामारी देखील होते. या व्हिडिओ अलगद तुमच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो.

Squirrels viral video | News
Water Metro Goa: ‘वॉटर मेट्रो’साठी पुढचे पाऊल! अभ्यास पथकाची 28 ठिकाणी भेट; अहवाल पाठवणार पुढे

येथे पाहा व्हिडिओ (Watch Video Here)

Squirrels viral video | News
BJP X INC Goa: काँग्रेस विद्यार्थी संघटनेने दामू नाईकांसाठी बुक केली मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट

व्हिडिओत दोन खारुताई खाऊसाठी भांडताना दिसत आहे. एक व्यक्ती काचेच्या गोलाकार जागेतून त्यांना खाऊ (गाजर) देत आहे. गाजराच्या तुकडा कोण खाणार यासाठी या दोन खारी भांडत आहेत. गाजर खाण्यासाठी दोघींची धडपड दिसत आहे. दरम्यान, एका खारीला गाजर मिळल्यानंतर दुसरी खार काहीसी आक्रमक होताना दिसते आणि ती खाऊसाठी तिच्याशी झगडते.

एकीला खाऊ मिळाल्यानंतर नाराज झालेल्या दुसऱ्या खारुताईला देखील खाऊ देण्यात येतो. खाऊ मिळाल्यानंतर खारुताई काहीसी सुखावल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओ हलका फुलका असला तरी दोन्ही खारुताईंची खाऊसाठी होणारी मारामारी आणि खाऊ मिळाल्यानंतर त्यांचा दिसणारा आनंद व्हिडिओ तुम्हालाही काहीकाळासाठी आनंद देऊन जातो हे नक्की!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com