Village Function Video: सोशल मीडियाच्या जगात दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेदार, कधी थरारक तर कधी भावनिक. या व्हिडिओंपैकी काही व्हिडिओ असे असतात, जे पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही. हा व्हिडिओ (Video) एका गावात घडलेल्या एका मजेदार घटनेचा आहे.
गावात राहणाऱ्या लोकांना माहीती असेलच की, कार्यक्रमात ‘पंगत’ (सामुदायिक भोजन) पद्धती प्रचलित आहे. यात अनेक लोक एकाच वेळी एकत्र बसून जेवतात आणि सर्वांना एकत्र वाढले जाते. व्हिडिओमध्ये अनेक लोक जेवून उठलेले दिसत आहेत आणि एक माणूस सगळ्यांच्या पत्रवाळ्या उचलत आहे. त्याचवेळी, एक तरुण अजूनही जेवत होता, पण पत्रवाळी उचलणाऱ्या माणसाने गडबडीत त्याचीही पत्रवाळी उचलली. त्याचे हे वर्तन पाहून जेवणारा तरुण काहीसा गोंधळला. या अनपेक्षित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरले नाही.
हा व्हिडिओ एक्स (X) प्लॅटफॉर्मवर @DrYashTiwari नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “गजब की बेइज्जती आहे यार!” हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला असून, त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अनेक युजर्संनी हसण्याचे इमोजी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ही घटना जरी लहान असली, तरी त्यातून गावांमधील सामुदायिक जेवण आणि त्यातील गंमतीजमती दिसून येतात. आधुनिक काळात हे प्रकार कमी झाले असले तरी, अशा घटना अजूनही लोकांमध्ये विनोद निर्माण करतात. या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले की, सोशल मीडियावर मनोरंजक आणि मजेदार कंटेंटला नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.