Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: डोक्यावर पट्टी अन् तुटलेला हात घेऊन फलंदाजी... क्रिकेट वेड्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Viral Cricket Video: भारतासारख्या देशात लोक क्रिकेटचे किती दिवाने आहेत, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. हा खेळ येथील लोकांच्या नसा-नसांत भिनलेला आहे.

Manish Jadhav

Viral Cricket Video: भारतासारख्या देशात लोक क्रिकेटचे किती दिवाने आहेत, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. हा खेळ येथील लोकांच्या नसा-नसांत भिनलेला आहे. लोक आपली सर्व कामे सोडून तासन्तास क्रिकेट खेळताना किंवा पाहताना दिसतात. खेळाबद्दलचे हे वेड आणि अदम्य इच्छाशक्ती अनेकदा दुखापती आणि अडचणींवरही मात करताना दिसते. असाच एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा डोक्यावर पट्टी आणि तुटलेला हात घेऊन फलंदाजी करत आहे. त्याची ही ध्येयवेडी वृत्ती पाहून लोक त्याचे कौतुक करताना थकत नाहीयेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दुखापतग्रस्त अवस्थेतही क्रिकेट खेळण्याची जिद्द

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. हे दृश्य तसे सामान्य आहे, कारण भारतात प्रत्येक गल्लीत, चौकात मुले क्रिकेट खेळताना दिसतात. पण या व्हिडिओमध्ये एक गोष्ट वेगळी आहे, ज्यामुळे लोकांचे लक्ष त्या तरुणावर खिळले आहे.

तो तरुण अपघातात जखमी झालेला दिसत आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यावर मोठी पट्टी बांधलेली आहे. तसेच, त्याचा एक हात तुटलेला असून त्यावर प्लास्टर बांधलेले आहे. अशा अवस्थेतही तो फलंदाजी करण्यासाठी इतका उत्सुक आहे की, त्याला पाहून त्याचे मित्रही त्याला खेळण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. "अरे, तुझा हात दुखत आहे, डोक्यालाही लागलंय, नको खेळू," असे त्याचे मित्र त्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो पठ्ठ्या ऐकायला काही तयार नाही. खेळण्यासाठी त्याचा हट्ट सुरुच आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो एका हाताने बॅट पकडून गोलंदाजाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

दरम्यान, हा हृदयस्पर्शी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @studentgyaan नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून तो मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केला जात आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देत त्या तरुणाच्या जिद्दीला सलाम केला आहे.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, "भाऊच्या या हिमतीला सलाम." दुसऱ्या एकाने लिहिले, "क्रिकेट म्हणजे फक्त एक खेळ नाही, तर तो एक जज्बा आहे आणि या तरुणाकडे तो पुरेपूर आहे." तर तिसऱ्याने लिहिले की, "हा तरुण तर क्रिकेटचा सच्चा फॅन निघाला." या प्रतिक्रिया केवळ त्या पठ्ठ्याच्या कौतुकच करत नाहीत, तर क्रिकेटबद्दल भारतीयांच्या मनातील भावनाही व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripurari Poornima: विठ्ठलापुरात वाळवंटी काठी रंगणार 'त्रिपुरारी उत्सव'! कृष्ण मिरवणूक, त्रिपुरासुर वध, नौकानयन सोहळ्याचे आकर्षण

IFFI 2025: रेड कार्पेट सजतोय! राजधानीत 'इफ्फी'ची लगबग; परिसरात उत्सवी वातावरण

Goa Police Suspension: पैशांची मागणी, खुनाचा प्रयत्‍न! राज्यात दहा महिन्‍यांत 16 पोलिसांचे निलंबन! खाकी वर्दीवरील काळे डाग चर्चेत

Goa Census: जातनिहाय जनगणना होणार 2027 मध्ये! पुढील वर्षी घरांची गणना; 3 हजार प्रगणकांची नियुक्ती

Uguem: 'आमचा गाव बुडतोय, झाडं कोसळत आहेत'! जबाबदार कोण? उगवे परिसरात स्थानिकांना अवैध रेती व्यवसायाची झळ

SCROLL FOR NEXT