
Bhojpuri Song Video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात, जे लोकांना कधी थक्क करतात, तर कधी हसवतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एक साप मोबाईलवर सुरु असलेले भोजपुरी गाणं बंद करताना दिसत आहे. या मजेदार व्हिडिओने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे की, एक साप मोबाईल कसा वापरु शकतो.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एक स्मार्टफोन स्टँडवर ठेवलेला दिसत आहे. फोनच्या स्क्रीनवर एक भोजपुरी गाणं चालू आहे, ज्यामध्ये नायक आणि नायिका नाचताना दिसत आहेत. त्याचवेळी, सुमारे 2-3 फूट लांबीचा एक साप फोनच्या दिशेने सरपटत येतो. काही वेळ तो स्क्रीनकडे पाहतो आणि अचानक आपली जीभ स्क्रीनला लावतो. जीभ लागताच गाणं लगेच बंद होते. यानंतर, साप शांतपणे फोनपासून दूर निघून जातो. हे दृश्य पाहून असे वाटते की, सापाला ते गाणं अजिबात आवडले नाही आणि त्याने ते बंद केले. हा व्हिडिओ अत्यंत मजेशीर असल्यामुळे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या अनोख्या व्हिडिओला पाहून सोशल मीडिया युजर्स आपले हसू आवरु शकले नाहीत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून, त्यावर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
एका युजरने कमेंट करताना लिहिले की, "मला वाटतं सापबाबांना भोजपुरी गाणं अजिबात आवडलं नाही, लगेच बंद करुन टाकलं!" तर दुसऱ्या एका युजरने हसत हसत लिहिले, "हा साप तर म्युझिक क्रिटिक निघाला, गाणं ऐकून लगेच रिव्ह्यू दिला." काही लोकांनी या व्हिडिओला विनोदी कॅप्शनसह शेअर केले आहे, तर काही जणांनी प्रश्न विचारला की, सापाने असे कसे केले? हा केवळ एक योगायोग होता की सापाला खरोखरच ते गाणं पसंत नव्हते?
हा व्हिडिओ सोशल मीडिया (Socal Media) प्लॅटफॉर्म एक्स (X) वर @NazneenAkhtar23 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहिपर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, शेकडो लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडिओमधील ही घटना खरोखरच अनपेक्षित आणि मनोरंजक आहे. या व्हिडिओमुळे लोकांमध्ये थोडी चर्चाही सुरु झाली आहे. काहींच्या मते, हे केवळ एका योगायोगामुळे घडले असेल, तर काहींना वाटते की प्राण्यांचीही स्वतःची आवड-निवड असते. कारण काहीही असो, या व्हिडिओने लोकांना एक मनोरंजक आणि वेगळा अनुभव दिला आहे. या व्हिडिओने इंटरनेटच्या जगात एक नवा ट्रेंड सुरु केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.