आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण पिढी कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे चित्र दिसत आहे. 'लाईक्स' आणि 'व्ह्यूज'च्या हव्यासापोटी जीवघेणे स्टंट करणे अनेकांच्या जीवावर बेतत आहे. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रील बनवण्याच्या नादात तीन तरुणांचा भीषण अपघात झाला असून त्यांचे तोंड थेट डिव्हायडरला जाऊन धडकले आहे.
व्हायरल होत असलेल्या अवघ्या १५ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक हायवे दिसत आहे. एका दुचाकीवर तीन तरुण स्वार असून चालक स्टंट दाखवण्याच्या तयारीत असतो. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटते, मात्र अचानक चालक दुचाकीचे पुढचे चाक हवेत उचलतो.
काही सेकंद गाडी हवेत राहते, पण वेगावरचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडीचा समतोल बिघडतो आणि अनपेक्षितरित्या गाडी थेट महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन धडकते.
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवर पुढे बसलेल्या दोन तरुणांचे तोंड थेट सिमेंटच्या डिव्हायडरवर जाऊन आदळले. मागच्या बाजूला बसलेला तिसरा तरुण तुलनेने थोडा सुरक्षित राहिला असला तरी, हा संपूर्ण प्रसंग पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी या तरुणांनी सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून स्वतःचा जीव धोक्यात घातला.
हा व्हिडिओ एक्स (ट्विटर) वर शेअर करण्यात आला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्सनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, "रस्ते हे स्टंट दाखवण्यासाठी नसून सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचण्यासाठी असतात." आयुष्य खूप मौल्यवान असून अशा प्रकारे रीलच्या नादात ते वाया घालवू नका, असे आवाहनही अनेकांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.