Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

Elephant attacks car viral video: जंगलातील प्राण्यांचे आणि मानवाचे आमनेसामने येण्याचे अनेक व्हिडिओ आपण रोज पाहतो, मात्र सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा एक व्हिडिओ पाहून थरकाप उडेल.

Sameer Amunekar

जंगलातील प्राण्यांचे आणि मानवाचे आमनेसामने येण्याचे अनेक व्हिडिओ आपण रोज पाहतो, मात्र सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा एक व्हिडिओ पाहून थरकाप उडेल. एका काळोख्या रात्री, सुनसान रस्त्यावर अचानक 'यमराजा'च्या रूपात एक महाकाय हत्ती कारसमोर येऊन उभा ठाकला. त्यानंतर जे काही घडले, ते एखाद्या हॉरर चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नव्हते. ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे एका कुटुंबाचा जीव थोडक्यात वाचला आहे.

सूंडने कारला हलवलं अन् मृत्यूशी पडली गाठ

इन्स्टाग्रामवरील @kerala_tamizhachi_vlogs या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, रात्रीच्या शांततेत एक कार रस्त्याच्या कडेला उभी आहे. सुरुवातीला नेमका काय प्रकार सुरू आहे हे समजत नाही, पण अचानक झाडीतून एक अक्राळविक्राळ हत्ती बाहेर येतो आणि कारवर हल्ला चढवतो. हा हत्ती इतका संतापलेला होता की त्याने आपल्या शक्तीनिशी कारला खेळण्याप्रमाणे हलवायला सुरुवात केली. कारचे काच फुटण्याच्या बेतात असतानाच काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग ओढवला.

ड्रायव्हरची हिंमत आणि मृत्यूच्या जबड्यातून सुटका

हत्ती ज्यावेळी कार उलटवण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी ड्रायव्हरने कमालीचा संयम आणि हिंमत दाखवली. कार पूर्णपणे पलटी होण्यापूर्वीच ड्रायव्हरने वेगाने एक्सीलरेटर दाबला आणि कार हत्तीच्या तावडीतून बाहेर काढली. हा व्हिडिओ पाहताना असे वाटते की, आता कारमधील लोकांचे काही खरे नाही, पण ड्रायव्हरच्या एका निर्णयाने सर्वांचे प्राण वाचवले. हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून तो आता वेगाने व्हायरल होत आहे.

नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस

या रोंगटे उभे करणाऱ्या व्हिडिओला आतापर्यंत २१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर लोक ड्रायव्हरच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. एका युजरने गमतीने लिहिले की, "बहुधा गजराज कारची 'बिल्ड क्वालिटी' चेक करत होते." तर दुसऱ्याने म्हटले, "जेव्हा हत्ती दुसऱ्या कारकडे वळला, तेव्हा असं वाटलं की तो म्हणतोय- आता तुझी पाळी!" मात्र, बहुतेकांनी वन्यप्राण्यांच्या क्षेत्रातून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT