Child Happy Independence Day Video: आज भारत आपला 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, जिथे मुले भाषणे, नृत्य आणि इतर कला सादर करुन स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करतात. याच स्वातंत्र्य दिनाच्या तयारीच्या निमित्ताने एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
दरम्यान, व्हिडिओमध्ये (Video) एक चिमुकला शाळेच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी भाषणाची तयारी करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये हा मुलगा वारंवार "हॅप्पी इंडिपेंडेंस डे" म्हणण्याचा प्रयत्न करतो, पण बोलताना त्याची जीभ अडखळते. अनेक प्रयत्नांनंतरही तो हा शब्द व्यवस्थित बोलू शकत नाही. तो “हॅप्पी इंडिपेंडेंस डे” ऐवजी ‘हॅप्पी अंडस पंडस’ असे शब्द उच्चारत आहे. त्याचे हे निरागस प्रयत्न आणि तयारी पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. त्याचे हे प्रयत्न इतके गोड आणि हृदयस्पर्शी आहेत की, ते पाहणाऱ्या प्रत्येकाचे मन जिंकून घेतात.
या चिमुकल्याचा व्हिडिओ @log.kya.kahenge नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून, हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडिओवर लोकांच्या अनेक मजेदार कमेंट्सही आल्या आहेत. काही कमेंट्स वाचून लोक हसून लोटपोट झाले आहेत.
एका युजरने कमेंट केली की, “भावा, प्रयत्न करत राहा, पुढच्या वर्षीपर्यंत बोलायला शिकशील.”
दुसऱ्याने कमेंट केली की, “जोपर्यंत हा मुलगा ‘हॅप्पी इंडिपेंडेंस डे’ म्हणायला शिकेल, तोपर्यंत प्रजासत्ताक दिन येईल.”
तर तिसऱ्याने लिहिले की, “अरे बाबा राहू दे, आम्हाला कळले आहे.”
काही लोक या मुलाची मस्करी करत असले तरी, अनेकांनी त्याच्या निरागसतेचे आणि देशभक्तीच्या भावनेचे कौतुक केले आहे. स्वातंत्र्य दिनाचा हा खरा आनंद आणि उत्साह या चिमुकल्याच्या निरागस प्रयत्नातून दिसून येत आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.