Viral Video Dainik Gomatak
देश

Viral Video: 'मृत्यूला चकवा' देणारा थरार! पठ्ठ्यानं भरधाव रस्ता गाडी न पाहता केला क्रॉस; नेटकरी म्हणाले, ''हा लवकरच यमलोकात जाणार''

Viral Video Bike Stunt Narrow Escape Truck: सध्या इंटरनेटवर असाच एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Manish Jadhav

Viral Video Bike Stunt Narrow Escape Truck: मनोरंजनासाठी असो वा वेळ घालवण्यासाठी, प्रत्येक जण आज इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा एक्स वर स्क्रोल करताना दिसतो. सोशल मीडियावर दररोज हजारो रील्स आणि व्हिडिओ अपलोड होतात, ज्यामध्ये कधी अतरंगी जुगाड, कधी मारामारी, तर कधी अंगावर काटा आणणारे थरारक स्टंट पाहायला मिळतात. सध्या इंटरनेटवर असाच एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडिओमधील तरुणाचा अचरटपणा पाहून नेटकऱ्यांनी थेट "हा माणूस थेट यमराजाच्या दारातून परत आलाय," अशा प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

आजकाल अनेक दुचाकीस्वार आणि रायडर्स रस्त्यावरुन जाताना आपल्या 'गोप्रो' (GoPro) किंवा स्मार्ट हेल्मेट कॅमेऱ्याच्या मदतीने रस्ता रेकॉर्ड करत असतात. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओसुद्धा अशाच एका रायडरच्या कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओमध्ये दिसते की, रस्ता ओलांडण्यासाठी सर्वच वाहने ट्रॅफिक क्लिअर होण्याची शांतपणे वाट पाहत उभी आहेत. मात्र, तितक्यात तिथे एका तरुणाची एन्ट्री होते, ज्याला बहुधा आपल्या जीवाची अजिबात पर्वा नसावी. तो तरुण कोणत्याही भीतीशिवाय एका वेगाने येणाऱ्या छोट्या ट्रकच्या अगदी समोरुन अत्यंत वेगाने दुचाकी घेऊन निघून जातो.

ट्रक आणि त्या तरुणाच्या गाडीमध्ये अवघ्या काही इंचाचे अंतर उरले होते. जरासाही ताळमेळ चुकला असता, तर तिथे मोठा अनर्थ घडला असता. मात्र, हा तरुण अगदी मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बाहेर पडला.

हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ 'एक्स' वर @VishalMalvi_ नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हा भाई फक्त चमत्कारांवर विश्वास ठेवतो, विशेषतः भारतीय रस्त्यांवर!' हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच काही वेळातच हजारो लोकांनी तो पाहिला असून त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युझरने लिहिले की, "हा भाई अमर आहे, याला काहीच होऊ शकत नाही."

दुसऱ्या एकाने उपरोधिकपणे म्हटले, "बहुधा याच्याकडे पबजी गेमसारखं पुन्हा जिवंत (रिवाईव्ह) होण्याचं ऑप्शन उपलब्ध असावं." तर एका संतप्त युझरने "असे लोक स्वतःसोबत इतरांचाही जीव धोक्यात घालतात, हा लवकरच यमलोकात जाईल," अशी तिखट प्रतिक्रिया दिली. हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जोरदार चर्चेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

संसदेत राडा! महिला खासदारानं पंतप्रधानांवर फेकली अंडी; म्हणाली, "तुम्हाला लाज वाटली पाहिजे..." Watch Video

VIDEO: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! विजयी शॉटनंतर बॅट घेऊन प्रतिस्पर्ध्यावर धावला फलंदाज; इतर खेळाडू नसते तर... व्हिडिओ व्हायरल

Lucky Zodiac Signs 2026: कामाचा ताण अन् नव्या जबाबदाऱ्यांचं आव्हान! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीचं नशीब घेणार वळण; मेहनतीचं फळ लगेच मिळणार नाही

Bicholim: डिचोली पालिकेचे होणार 15 प्रभाग, फेररचनेचा नवीन मसुदा तयार; मावळत्या नगरसेवकांना फटका

SCROLL FOR NEXT