Elephant Dainik Gomantak
देश

Viral Video: जंगलात पिकनिकचा आनंद घेणाऱ्यांची उडाली भंबेरी! अचानक 'हा' प्राणी समोर येताच लोक धावू लागले सैरावैरा

Viral Elephant Video Assam Arunachal: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल.

Manish Jadhav

सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल. जंगलातील एका नदीकाठी लोक त्यांच्या फॅमिलीबरोबर आनंद घेत असताना थरकाप उडवणारी घटना घडली.

आधी हा व्हिडिओ पाहा

हत्तीची एन्ट्री

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, घटनास्थळी लोक त्यांच्या फॅमिलीबरोबर पिकनिकचा आनंद घेत आहेत. त्यांच्यापैकी काही जण घटनास्थळी जेवण बनवताना दिसत आहेत. त्याचदरम्यान जंगलातून एक भलामोठा हत्ती (Elephant) बाहेर येतो आणि त्यांच्याकडे दिशेने धावू लागतो. हत्तीला पाहून लोक घाबरुन सैरावैरा धावू लागतात. यावेळी, तिथे उपस्थित असलेल्या एका वाहन चालकानेही हत्तीला पाहून आपला मार्ग बदलला. सुदैवाने हत्तीने कोणालाही इजा पोहोचवली नाही. तो जंगलात निघून गेला. ही घटना आसाम-अरुणाचल सीमेवर असलेल्या एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर घडल्याचे वृत्त आहे. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला.

दरम्यान, हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या हँडल @ParveenKaswan वर शेअर केला. त्यांनी विचारले की, ही कोणाची चूक आहे? दुसरीकडे मात्र, या घटनेमुळे लोकांमध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आहे. काही लोकांनी अशा घटना रोखण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पावले उचलली जात नसल्याचा आरोप केला, तर काही लोकांनी ही वनक्षेत्रात पिकनिकसाठी जाणाऱ्यांची चूक असल्याचे म्हटले.

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, सरकारने अशा ठिकाणी लोकांच्या हालचालींवर बंदी घालावी. तर दुसऱ्याने लिहिले की, जर तुम्ही हत्तींच्या घरात प्रवेश केला तर ते नक्कीच रागावतील. वन विभागाने या दिशेने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT