Girl drinks petrol every morning Dainik Gomantak
देश

Viral News: चहा-कॉफी नाही, ही तरुणी रोज सकाळी उठून पिते 'पेट्रोल'; कारण ऐकून डॉक्टरही चक्रावले!

Girl drinks petrol every morning: सर्वसाधारणपणे जगभरात बहुतांश लोकांची सकाळ चहा किंवा कॉफीच्या कपने होते. अनेकांना तर सकाळी उठल्या-उठल्या 'बेड-टी' मिळाल्याशिवाय डोळेही उघडत नाहीत.

Sameer Amunekar

सर्वसाधारणपणे जगभरात बहुतांश लोकांची सकाळ चहा किंवा कॉफीच्या कपने होते. अनेकांना तर सकाळी उठल्या-उठल्या 'बेड-टी' मिळाल्याशिवाय डोळेही उघडत नाहीत. परंतु, जर कोणी तुम्हाला सांगितले की, एक तरुणी रोज सकाळी उठून चहाऐवजी चक्क पेट्रोल पिते, तर तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही. सुरुवातीला ही गोष्ट निव्वळ एक विनोद वाटू शकते, मात्र ही अत्यंत धक्कादायक घटना अगदी खरी आहे.

'माय स्ट्रेंज अ‍ॅडिक्शन' शोमध्ये धक्कादायक खुलासा

कॅनडामध्ये राहणारी शॅनन नावाची तरुणी सध्या तिच्या याच अत्यंत विचित्र आणि जीवघेण्या सवयीमुळे जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. शॅननच्या या अजब व्यसनाचा खुलासा अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो ‘माय स्ट्रेंज अ‍ॅडिक्शन’ मध्ये करण्यात आला आहे. तिची ही सवय पाहून सामान्य जनता तर सोडाच, पण वैद्यकीय क्षेत्रातील मोठे डॉक्टर आणि तज्ज्ञही पूर्णपणे थक्क झाले आहेत.

सुवासाच्या आवडीतून जडले जीवघेणे व्यसन

शॅननची ही कहाणी जितकी थक्क करणारी आहे, तितकीच ती भीतीदायकही आहे. या शोमध्ये सांगण्यात आले की, सुरुवातीला शॅननला पेट्रोलचा वास प्रचंड आवडायचा. ती अनेकदा पेट्रोलच्या बाटलीचा किंवा कॅनचा वास घेत असे. मात्र, हा सुवास घेण्याची आवड हळूहळू एका गंभीर व्यसनात कधी बदलली, हे तिचे तिलाच समजले नाही. काळाच्या ओघात ही सवय तिच्यावर इतकी हावी झाली की, तिने थेट पेट्रोल पिण्यास सुरुवात केली.

शॅननच्या सांगण्यानुसार, जेव्हा ती पेट्रोल पिते, तेव्हा तिच्या जिभेवर थोडी खाज सुटल्यासारखी (झुनझुनी) होते आणि घशात तीव्र जळजळ जाणवते. असे असूनही ती स्वतःला पेट्रोल पिण्यापासून रोखू शकत नाही. जेव्हा जेव्हा ती मानसिक तणावात असते किंवा तिला एकटेपणा जाणवतो, तेव्हा ती शांततेसाठी पेट्रोल पिते.

हे व्यसन आता इतक्या टोकाला पोहोचले आहे की, शॅनन सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी पेट्रोल पिते. इतकेच नाही तर ती दिवसभरात अनेक वेळा पेट्रोलचे घोट घेते आणि रात्री झोपण्यापूर्वीही तिला पेट्रोल लागतेच. तिच्या कुटुंबातील सदस्य तिला या जीवघेण्या सवयीपासून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, परंतु ती त्यांच्यापासून लपून छपूनही पेट्रोल पिते.

डॉक्टरांचा गंभीर इशारा: कोणत्याही क्षणी जाऊ शकतो जीव

जेव्हा शॅननचे हे प्रकरण वैद्यकीय तज्ज्ञांसमोर आले, तेव्हा त्यांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली. डॉक्टरांच्या मते, पेट्रोल हे अत्यंत विषारी रसायन आहे. याचे सेवन केल्याने मानवी शरीरातील फुफ्फुसे, यकृत (Liver), किडनी आणि मेंदूचे गंभीर नुकसान होते. सतत पेट्रोल प्यायल्याने मज्जासंस्थेचे आजार आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर, ही सवय कोणत्याही क्षणी तिचा जीव घेऊ शकते.

या अजब सवयीमागील नक्की कारण काय?

मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या (Mental Health Experts) मते, ही केवळ एक साधी सवय किंवा व्यसन नसून एक दुर्मिळ वैद्यकीय आजार आहे. वैद्यकीय भाषेत या स्थितीला 'पिका डिसऑर्डर' (Pica Disorder) म्हटले जाते. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला माती, खडू, रंग किंवा पेट्रोल यांसारख्या अखाद्य वस्तू खाण्याची किंवा पिण्याची तीव्र इच्छा होते, ज्या मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असतात. अनेकदा तीव्र नैराश्यामुळे (Depression) देखील लोक अशा प्रकारच्या घातक सवयींचे बळी ठरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आप'चे गोवा सहप्रभारी सिंगला 'ईडी'कडून अटक; मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीसह गोव्यात झडती, अनेक आरोप

Goa Drowning Death: मासेमारीसाठी नदीत उतरले अन् घात झाला; थिवी नदीत बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू

NEET Paper Leak Case: मोटेगावकरच्या मुसक्या आवळल्या; पुण्यात सीबीआयची कारवाई, 9 दिवसांची कोठडी

FIFA World Cup 2026: नेमारच्या खेळण्यावर अखेर शिक्कामोर्तब, मैदानावर दिसणार 'नेमार मॅजिक'! ब्राझीलचा संघ जाहीर, प्रतिस्पर्ध्यांचं टेन्शन वाढलं

Goa Landslide: दरड कोसळून 1 कामगार ठार; 1 जखमी, सडा-हार्बर मार्गावर रस्त्याच्या कामावेळी दुर्घटना; प्रसंगावधनामुळे तिघे वाचले

SCROLL FOR NEXT