Agnimitra Paul ANI
देश

'तृणमूलचे कार्यकर्ते आम्हाला मारत होते अन् पोलीस बघत होते...' भाजपचा आरोप

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आज 12 एप्रिल रोजी दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पण आता केंद्रीय गृहमंत्रालयाने CAPA च्या आणखी 5 कंपन्या पश्चिम बंगालला पाठवल्या आहेत. या सर्व कंपन्या निवडणूक क्षेत्रात तैनात असतील. यापूर्वी केंद्र सरकारने 133 CAPF कंपन्या तैनात केल्या होत्या. असे असताना आज या भागात काही राजकीय कार्यर्त्यांमध्ये आणि पोलीस दलामध्ये चकमक झाल्याचे दिसून आले.

आसनसोलमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना हिंसाचार झाला. यावेळी पोलिसांनी काही राजकीय कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केला. "टीएमसीच्या (TMC) लोकांनी आमच्यावर हल्ला केला, आमच्या ताफ्यावर दगडफेक केली यावेळी पोलिसही काही करत नाहीत, असा आरोप या जागेसाठी निवडणूक लढवणारे भाजपच्या (BJP) उमेदवार अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांनी केला.

दरम्यान पश्चिम बंगालमधील एक विधानसभा आणि एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 138 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी घोषणा निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात केली होती. परंतु राज्यातील बीरभूम जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या हिंसाचारामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून सातत्याने अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले जात आहे. 133 कंपन्या तैनात केल्यानंतर आणखी 5 कंपन्या निवडणूक क्षेत्रात पाठवण्यात येत आहेत. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही.

दोन्ही जागांवर पोटनिवडणूक का होत आहे?

बाबुल सुप्रियो पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून खासदार होते, परंतु निवडणुकीदरम्यान त्यांनी पक्ष सोडला आणि टीएमसीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीत अभिनेता आणि टीएमसी नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा सामना भाजपच्या अग्निमित्रा पॉलशी होणार आहे. ही जागा टीएमसीने कधीही जिंकलेली नाही. मात्र पोटनिवडणुकीत चुरशीची लढत असल्याचे बोलले जात आहे. या जागेवर भाजपने पूर्ण जोर लावला आहे, तर टीएमसीनेही यावेळी आपली ताकद लावली आहे.

आसनसोल लोकसभा जागेशिवाय पश्चिम बंगालमधील बालीगंगे विधानसभा जागेवरही पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातील आमदार सुब्रत मुखर्जी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. या जागेवर टीएमसीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT