Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप आणि तृणमूलच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगाल विधानसभेत मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप आमदार मनोज तिग्गा आणि टीएमसी आमदार असित मजुमदार यांच्यात हाणामारी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या (BJP) पाच आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित आमदारांमध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, नरहरी महतो, शंकर घोष, दीपक बर्मन यांचा समावेश आहे.

बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कथित मारहाणीनंतर भाजपचे आमदार (MLA) विधानसभेतून बाहेर पडले. भाजप आमदारांनी आरोप केला आहे की त्यांना बीरभूमवर चर्चा हवी होती.

भाजप आमदार मनोज तिग्गा यांनी विधानसभेच्या बाहेर निदर्शनादरम्यान सांगितले की, टीएमसी (TMC) आमदारांनी त्यांना धक्काबुक्की आ केली. यानंतर भाजपचे आमदार आणि बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी विधानसभेबाहेर घोषणाबाजी केली.

या गदारोळानंतर भाजप नेते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते बीएल संतोष यांनी लिहिले की, बंगालच्या राजकारणात नवी घसरण पाहायला मिळाली आहे. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यापासून पातळी घसरत आहे. आज भाजप आमदार मनोज तिग्गा आणि इतरांवर हल्ला करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT