Shivraj Singh Chouhan Dainik Gomantak
देश

''मामा जरा जपून-जपून'' लग्नसमारंभात 'सरकार' चा जिन्यावरुन गेला तोल, पाहा VIDEO

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) एका लग्न समारंभात घसरुन पडले.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान एका लग्न समारंभात घसरुन पडले. यादरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना घाईघाईने उचलले आणि नंतर सर्वजण पुढे निघून गेले. ही संपूर्ण घटना उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधम सिंह नगरमधील काशीपूरमधील (Kashipur) एका मोठ्या हॉटेलमध्ये घडली. जिल्ह्यातील काशीपूरमध्ये सोमवारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय सह-महासचिव शिवप्रकाश यांच्या पुतण्याच्या लग्नासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी देशातील अनेक राज्यांतून भाजपचे मुख्यमंत्री आणि बडे नेते आले होते. या पाहुण्यांमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचाही समावेश होता. (VIDEO CM Shivraj Singh Chouhan slipped on stairs at wedding ceremony)

यादरम्यान, सीएम शिवराज पार्टीसाठी निघताच अचानक जिन्यावरुन घसरुन पडले. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, लगेचच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून पुढे केले. या कार्यक्रमाला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. काशीपूरमधील बाजपूर रोडवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते शिवप्रकाश यांच्या पुतण्याच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते.

शिवाय, या कार्यक्रमात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आमदार पुत्र पंकज सिंह यांच्यासह देशातील अनेक राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली. भाजपचे राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिव प्रकाश हे मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगालच्या संघटनात्मक युनिटचे प्रभारी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT