Vicky Kaushal Katrina Kaif Blessed With baby Boy Dainik Gomantak
देश

Katrina Kaif Baby Boy: आई-बाबा झाले कतरिना कैफ- विकी कौशल! लग्नाच्या 4 वर्षांनी चिमुकल्याचे आगमन, PHOTO पोस्ट करत दिली माहिती

Vicky Kaushal Katrina Kaif Blessed With Baby Boy : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या घरात आनंदाचा क्षण आला आहे. बॉलिवूडमधील या सुपरस्टार जोडप्याने आपल्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं.

Sameer Amunekar

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या घरात आनंदाचा क्षण आला आहे. बॉलिवूडमधील या सुपरस्टार जोडप्याने आपल्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं असून, अभिनेत्री कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाबाबत प्रचंड उत्सुकता होती. आता त्यांच्या या आनंदाच्या क्षणाने संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

विकी कौशलने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदवार्ता दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “आम्ही खूप प्रेमाने आणि कृतज्ञतेने आमच्या मुलाचं स्वागत करतोय,” पोस्टच्या शेवटी त्याने आपल्या मुलाच्या जन्मतारीख ७ नोव्हेंबर २०२५ अशी नमूद केली आहे.

या पोस्टनंतर सोशल मीडियावर अभिनंदनांचा वर्षाव सुरू झाला आहे. बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकारांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, मनीष मल्होत्रा, निमरत कौर, हुमा कुरेशी आणि उपासना कोनिडेला यांनी कमेंट्स करून कतरिना आणि विकीला भरभरून शुभेच्छा दिल्या. फॅन्सनीसुद्धा सोशल मीडियावर #VickyKatrinaBabyBoy या हॅशटॅगसह आनंद व्यक्त केला आहे.

कतरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नाला आता जवळपास चार वर्षे झाली आहेत. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील भव्य ‘सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा’ येथे लग्न केलं होतं. हा समारंभ अतिशय खास आणि मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. नंतर या जोडप्याने मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना निमंत्रित केलं होतं.

लग्नाआधी दोघे काही काळ एकमेकांना डेट करत होते, परंतु त्यांनी आपल्या नात्याबद्दल जास्त चर्चा होऊ दिली नव्हती. आता पालक झाल्यानंतर चाहत्यांना या जोडप्याच्या छोट्या बाळाचं पहिलं छायाचित्र पाहण्याची उत्सुकता आहे. विकी आणि कतरिनाचं हे नवीन पर्व त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण मानलं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

विषारी इंजेक्शन देऊन 10 जणांची केली हत्या, 27 जणांना मारण्याचा केला प्रयत्न, 'सीरिअल किलर' नर्सला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Ahmedabad Plane Crash: मुलाची चूक नाही, तुम्ही ओझं घेऊ नका! न्यायालयाने पायलटच्या 91 वर्षीय वडिलांची काढली समजूत, केंद्राला बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT