Parliament
Parliament Dainik Gomantak
देश

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु, जाणून घ्या काय आहेत अटी

दैनिक गोमन्तक

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 19 जुलैपर्यंत चालणार आहे. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 22 जुलैपर्यंत नावे मागे घेता येणार आहेत. 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू (M Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ 19 ऑगस्ट रोजी संपत आहे.

विशेष म्हणजे, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट आघाडी मिळू शकते.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक गोष्टी

निवडणूक आयोगाने (Election Commission) अधिसूचना जारी केल्यानंतर मतदारांना पुढील उपराष्ट्रपतीची निवड करण्यास सांगून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होते. उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्रावर 20 प्रस्तावक आणि 20 अनुयायांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. एक मतदार उमेदवाराच्या केवळ एका नामनिर्देशनपत्रावर प्रस्तावक किंवा समर्थक म्हणून स्वाक्षरी करु शकतो. उमेदवार जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करु शकतो. निवडणुकीसाठी सुरक्षा ठेव रुपये 15,000 आहे.

कोण मतदान करतं?

लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत, ज्यामध्ये नामनिर्देशित सदस्यांचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठीच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील 788 सदस्यांचा समावेश होतो. इलेक्टोरल कॉलेजचे सर्व सदस्य संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असल्याने, प्रत्येक संसद (Parliament) सदस्याच्या मताचे मूल्य समान असेल, म्हणजे एक.

मतदान प्रक्रिया काय आहे?

एकल हस्तांतरणीय मताद्वारे आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीनुसार निवडणुका घेतल्या जातात. निवडणूक गुप्त मतदानाने घेतली जाते. या प्रणालीमध्ये मतदाराला उमेदवारांच्या नावासमोर पसंती दर्शवावी लागते. मतदारांनी निष्ठेने मतदानाची गुप्तता पाळणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत खुल्या मतदानाची संकल्पना नसून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतपत्रिका दाखवण्यास सक्त मनाई आहे.

मतदान प्रक्रियेच्या उल्लंघनासाठी कारवाई

1974 च्या नियमांमध्ये दिलेल्या मतदान प्रक्रियेत अशी तरतूद आहे की, मतदान कक्षात मत चिन्हांकित केल्यानंतर, मतदाराने मतपत्रिका मतपेटीत टाकली पाहिजे. मतदान प्रक्रियेचे कोणतेही उल्लंघन झाल्यास पीठासीन अधिकाऱ्याद्वारे मतपत्रिका रद्द करण्यात येईल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT