संविधानात्मक पदांचा दर्जा टिकवावा: उपराष्ट्रपती

दरबार हॉलचे उद्‍घाटन: नव्या राजभवनची निर्मिती व्हावी अशी राज्यपालांची अपेक्षा
M. Venkaiah Naidu
M. Venkaiah NaiduDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारत हा जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही म्हणून प्रसिद्ध आहे. शांततापूर्ण वातावरणात सत्ताबदल हे याचे वैशिष्ट्य आहे. म्हणून संसद आणि विधिमंडळाचा दर्जा आणि प्रतिष्ठेचा रक्षण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत. जनतेने दिलेल्या जनमताचा आदर करून सरकार कोणतेही येवो संविधानात्मक ढाच्या टिकला पाहिजे असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

दोनापावलाच्या राजभवनवर नव्याने उभारण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्‍घाटन शुक्रवारी, ता.4 रोजी उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात उपराष्ट्रपतींनी गोव्याबद्दल गौरवोद्गार काढत येथील समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि भाषिक, साहित्यिक वारसा जपण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन केले. ते म्हणाले, निसर्ग संपन्नता, लोकांचा प्रेमळपणा, आदरातिथ्य यामुळे गोव्याचे माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान आहे.

M. Venkaiah Naidu
बैलपार नदीची समस्या पूर्ण गोमंतकीयांची

अनेक आघाड्यांवर गोव्याची कामगिरी सरस आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असली तरीही आजही देशासमोर गरिबी, निरक्षरता, भेदभाव ही आव्हाने कायम असल्याचे नायडू यांनी मत व्यक्त केले. यावेळी राज्यपाल पिल्लई म्हणाले, राजभवन हे लोकांचे बनले पाहिजे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जुने राजभवन ही ऐतिहासिक वास्तू असून लोकांसाठी खुली करून राजभवनला जोडूनच नव्या राजभवनची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

असा आहे दरबार हॉल

हा हॉल संपूर्णतः गोमंतकीय घरांच्या रचनेला धरून आहे. उतरते छप्पर असलेल्या या हॉलला प्रशस्त व्हरांडे असून दोन्ही बाजू पारदर्शक आहेत. संपूर्ण बांधकाम 2200 चौरस मीटरचे असून 970 चौरस मीटरचे मुख्य सभागृह आहे. 450 चौरस मीटरचा डायनिंग हॉल असून 290 चौरस मीटर च्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या सूट आहेत. आधुनिक डिझाईनबरोबर अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत. बांधकामासाठी 18 कोटी रुपये खर्च झाले असून या हॉलची 800 आसन क्षमता आहे. एरवी सांस्कृतिक कार्यक्रमासोबत योगा, मेडिटेशनसाठी वापरण्याचा राजभवनचा इरादा आहे.

M. Venkaiah Naidu
मुख्यमंत्री सावंतांनंतर आता बाबू आजगावकरही निकालाआधी देवदर्शनाला

उपराष्ट्र्पतींच्या हस्ते सत्कार: दरबार हॉलसाठी विशेष योगदान दिलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, मुख्य आर्किटेक माविन गोम्स, प्रशांत देसाई, सुरूची शिरोडकर, विन्सन डिकोस्टा, जयराम सुतार यांचा गौरव झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com