Fali S Nariman  
देश

एका युगाचा अंत! दिग्गज वकील Fali S Nariman यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन

Fali S Nariman Death: "नरीमन अतुलनीय होते. ते पहिले व्यक्ती होते, ज्यांनी "हॉर्स ट्रेडिंग" हा शब्दप्रयोग वापरणे म्हणजे घोड्यांचा अपमान आहे असे म्हटले होते."

Ashutosh Masgaunde

Veteran lawyer Fali S Nariman passed away at the age of 95:

भारतातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनुभवी वकील फली एस नरिमन यांचे बुधवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नरिमन यांना वकील म्हणून 70 वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता. नोव्हेंबर 1950 मध्ये, फली एस. नरिमन यांची मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून नोंदणी झाली. 1961 मध्ये त्यांना ज्येष्ठ वकिलाचा दर्जा देण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयानंतर नरिमन यांनी 1972 मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. मे 1972 मध्ये त्यांची भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

जानेवारी १९९१ मध्ये नरिमन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ वकील असण्यासोबतच ते 1991 ते 2010 या काळात बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते.

यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांचा मान उंचावला. नरिमन हे 1989 ते 2005 पर्यंत इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनचे उपाध्यक्ष देखील होते. ते 1995 ते 1997 पर्यंत जिनेव्हाच्या आंतरराष्ट्रीय कमिशन ऑफ ज्युरिस्टच्या कार्यकारी समितीचे अध्यक्षही होते.

नरीमन यांनी लढलेल्या हाय-प्रोफाइल केसेसमध्ये कुप्रसिद्ध भोपाळ गॅस शोकांतिका, गोलक नाथ, एसपी गुप्ता आणि टीएमए पै फाउंडेशन यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे.

आपल्या वकिलीबरोबर फली सॅम नरिमन यांनी, गॉड सेव्ह द ऑनर सुप्रीम कोर्ट, मैं भूल ना जाओ, द स्टेट ऑफ द नेशन, बिफोर मेमरी फेड्स: एक आत्मचरित्र, भारताची कायदेशीर व्यवस्था यासारखी पुस्तकेही लिहिली आहेत.

फली एस. नरीमन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी X वर लिहिले, "ते एक दिग्गज होते, जे कायदा आणि सार्वजनिक जीवनाशी निगडित लोकांच्या नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या कर्तृत्वाव्यतिरिक्त, ते त्यांच्या तत्त्वांवर ठाम होते."

अभिषेक सिंघवी पुढे लिहितात, एक मजेशीर आणि डिनर नंतरचे वक्ते म्हणून, नरीमन अतुलनीय होते. ते पहिले व्यक्ती होते, ज्यांनी "हॉर्स ट्रेडिंग" हा शब्दप्रयोग वापरणे म्हणजे घोड्यांचा अपमान आहे असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT