ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार(Dilip Kumar) यांचे सकाळी 7.30 वाजता निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलं आहे.(Tragedy King)
मागील बऱ्याच दिवसांपासून दिलीप कुमार यांची तब्येत खूप खराब होती अनेकवेळा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि त्यातुन ते बरेही झाले मात्र यावेळी अभिनयाच्या या बादशहाला नशिबाने गुंगारा दिला आणि ट्रॅजेडी किंग साऱ्या जगाचा निरोप घेत एका नव्या पटलावर आपल्या अभिनय आणि व्यक्तिमत्वाचा ठसा उमटणवण्यसाठी जगाला सोडून गेला.
जून महिन्यातही त्यांना दोनदा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता.पण ११ जुन रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ही देण्यात आला होता.मात्र 30 जूनपासून त्यांना अशाच श्वासोच्छवासाच्या समस्यांना सामोरे जावे लागले आणि पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज शेवटी त्यांचे निधन झाले.
दिलीप कुमारांनी ६० च्या दशकात अनेक अभिजात हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये या दिग्गज अभिनेत्याने महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत . या चित्रपटांपैकी काही चित्रपटांमध्ये मुगल-ए-आजम, देवदास, नया दौड़, गंगा जुम्ना, राम और श्याम आणि इतरांचा समावेश आहे.त्यांची गाणे आजही तरुणाईला भुरळ पाडतात.
आयुष्यात यशाच्या आणि अभिनयाच्या सर्वोत्कृष्ट शिखरावर असूनही ज्यांचे पाय कायम जमिनीवर होते अशा अभिनयाच्या अवलियाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.